Rescue team personnel descending into the drain. esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर सचिनचा मृतदेह सापडला! महामार्गालगत पोद्दारशाळे शेजारील नाल्यात आला वाहून

Jalgaon News : २० तासानंतर थेट सचिन मृतदेह पाहायला मिळाल्याने त्याच्या आईवडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खंडेरावनगर परिसरात खेळतांना नाल्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहावर्षीय सचिन राहुल पवार याचा मृतदेह तब्बल २० तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्यात अडकलेला आढळून आला. २० तासानंतर थेट सचिन मृतदेह पाहायला मिळाल्याने त्याच्या आईवडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. (Jalgaon sachin body finally found Flowing into stream)

प्रवाहाच्या दिशेने शोध

रविवारी (ता. ७) सकाळी सातच्या सुमारास पुन्हा नाल्याच्या विविध भागांमध्ये प्रवाहाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने पुन्हा सचिनचा शोध घेण्यासाठी कार्य सुरू झाले. महापालिका अग्निशमन दल, परिसरातील तरुण, पट्टीचे पोहोणाऱ्यांची मदत घेण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास सचिनचा मृतदेहाचा शोध घेण्यात पोलिस नाईक जितेंद्र राजपूत, उमेश पवार यांच्या पथकाला यश आले.

महामार्गाजवळच पोतदार शाळेच्या कंपाउंडला लागून नाल्यात थर्माकोल आणि काडीकचऱ्यात सचिनचा मृतदेह अडकला होता. महापालिका कर्मचारी व काही तरुणांनी नाल्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. डोळ्यादेखत हसता खेळता मुलगा काळाच्या पडद्याआड गेल्याने रडून रडून कुटुंबीयांचे बेहाल झाले आहेत. (latest marathi news)

या पथकाने घेतला शोध

शोध व बचाव कार्यासाठी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या पथकातील जितेंद्र राजपूत, इम्रान मलिक, उमेश पवार, नीलेश पाटील, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, अजय सपकाळे, कमलाकर राजहंस, जुलालसिंग परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवींद्र भोई, दीपक महाले, गोकुळ सुतार, जगदीश बैरागी, योगेश गालफाडे, सीताराम पवार, ज्ञानेश्वर भालेराव, दुर्गेश पवार, सुपडू माळी, भगवान माळी, महापालिकेचे अधिकारी कांबळे आदींच्या पथकाने शोधकार्यात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 Rankings: टी-२० क्रमवारीत भारताचे वर्चस्व! अभिषेक–वरुण चमकले, सूर्यकुमारचे नेतृत्व अव्वल

Dev Deepawali 2025 : वाराणसीत देव दीपावलीचे अद्भुत दृश्य! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला पहिला दिवा

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

WPL 2026 Retention : वर्ल्ड कपची स्टार दीप्ती शर्मा संघाबाहेर; हरमनप्रीत कौर, स्मृती मानधनासह जेमिमाबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT