Prashant Tayade sitting on an indefinite fast in front of the District Council. esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार हा नित्याचाच झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार हा नित्याचाच झाला आहे. प्रामुख्याने माध्यमिक शिक्षण विभागात बेकायदेशीर नियुक्त्या देण्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. यात धनाजी नाना विद्यालयातील बेकायदेशीर नियुक्ती समोर आली आहे. या विरोधात खिरोदा (ता. रावेर) येथील कार्यकर्ते प्रशांत तायडे यांनी जिल्हा परिषेदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. (Jalgaon Secondary Education Department)

माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाबाबत अनेकांचा रोष आहे. या शिक्षण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या नियुक्त्या असो की कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदली प्रक्रिया असो. फाइल निकाली लावण्याचा मुद्दा देखील नेहमीच ऐरणीवर येत असतो. दरम्यान, २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील एका लिपीकाची बदली करण्यात आली होती.

मात्र, त्या लिपीकाने संबंधित लिपीकाला कपाटाच्या चाब्याच दिल्या नसल्याचा प्रकार समोर आला होता. तर आता खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

नोकरीला असताना शाळेत नियुक्ती

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हर्षल बोरोले याना २०२० मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मुळात २०१९ पासून बोरोले हे जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी या संस्थेच्या रावेर शाखेत कार्यरत असताना ही नियुक्ती देण्यात आल्याचे उपोषणास बसलेले प्रशांत तायडे यांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

ही नियुक्ती त्यांचे वडील तुकाराम बोरोले हे शाळेचे मुख्याध्यापक व पतपेढीच्या संचालक असताना मागील तारखेची नियुक्ती दाखवून केली आहे. याबाबत प्रशांत तायडे यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दिली आहे.

तायडे यांचे बेमुदत उपोषण

खिरोदा गावातीलच रहिवाशी असलेल्या प्रशांत सुरेश तायडे यांनी या बेकायदेशीर नियुक्ती विरोधात आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यात प्रामुख्याने बोरोले यांची नियुक्ती केलेल्या प्रस्तावाची प्रत, वैयक्तिक मान्यतेची प्रत, शालार्थ मान्यतेची प्रत व शालार्थ मान्यता आदेश, नियमित वेतन श्रेणी मान्यता प्रस्ताव व मान्यतेची प्रत तसेच बोरोले यांनी दिलेल्या राजीनामा मंजुरी प्रत व राजीनामा मंजुरी ठराव यांची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT