district hospital esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष; मेमध्ये तीव्र उन्हाच्या झळा

Jalgaon News : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत होते. मध्यंतरी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढत आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत होते. मध्यंतरी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र, मे महिना तीव्र उन्हाच्या झळांचा राहणार आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Separate ward for heatstroke in district hospital)

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयात (जीएमसी) आरोग्य प्रशासन सतर्क आहे. जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ होत आहे. मार्चपासूनच जिल्ह्यात उन्हाचे चटके बसायला सुरवात झाली. एप्रिलही उकाड्याचा राहिला. मेमध्ये उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

शरीरात नॉर्मल तापमान ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते. त्यामुळे माणसाच्या शरीरातील तापमानापेक्षा जास्त वाढले, तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरातील पाणी संपले, तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरड पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

त्याच अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातील जुन्या आयसीयू वॉर्डात दोन बेड, महिला वार्डात दोन बेड, पुरूष वॉर्डात तीन बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. आयसीयू एसी आहे. इतर ठिकाणी कुलरची व्यवस्था आहे. उष्माघात झालेल्या रुग्णावर तातडीचे उपचारासाठी नर्सेस, डॉक्टर, पुरेसा औषधसाठा आहे.

"उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जुन्या आयसीयूमध्ये महिला, पुरुष वॉर्डात उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सध्या तरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही."

-डॉ. विजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, मानाचे गणपती मार्गस्थ, गणेश भक्तांचा उत्साह

BCCI Sponsorship 2025 : नव्या प्रायोजकातून बीसीसीआय ४०० कोटींहून अधिक कमवणार? नेमका प्लॅन काय?

Ladki Bahin Scheme : 'या' कारणामुळे ‘लाडकी बहीण’ ठरणार अपात्र, नवा नियम काय सांगतो

Pune Rain : पुणे परिसरात आज पावसाचा अंदाज; बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

Red - White Onion: लाल आणि पांढरा कांदा खाताय? हे नक्की वाचाचं

SCROLL FOR NEXT