Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : सराफी दुकान फोडीतील साडे सहा किलो चांदी जप्त; दुकानाच्या पिशवीवरून लागला क्लू

Jalgaon Crime : शहर पोलिस ठाण्यासमोरील फुले मार्केट मध्ये रात्रीतून सलग तीन दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहर पोलिस ठाण्यासमोरील फुले मार्केट मध्ये रात्रीतून सलग तीन दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तोंडाला रुमाल बांधून सिसीटीव्हीत कैद या चोरट्यांनी रेडीमेड दुकानासह मालेगावात सराफी पेढीवरही मोठा हात मारला. फाटक्या कपड्यातील पोरं रोज रेडीमेड कपडे घालत असल्याची टिप मिळाल्यावरुन या गँगचा पर्दाफाश झाला. ( Six kg silver seized from burglary shop )

शहर पोलीस ठाण्यासमोरच फुले मार्केट मध्ये (ता.४) जूनला मैत्री कलेक्शन या रेडीमेड कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून कपड्यांसह १४ हजारांची रोकड लांबवली होती. शहर पोलिस ठाण्यासमोरील घरफोडीचे धाडस करणाऱ्या चोरट्यांनी पकडले मार्केटमध्ये तोंडाला रुमाल घट्ट बांधून केलेली घरफोडी सीसीटीव्हीत चित्रित असूनही त्यांची ओळख पटण्यासारखे काहीच पुरावे नसल्याने पोलिसांसाठी हा तपास आव्हान होता.

कापडी बॅगने सुगावा

पिंप्राळा हुडकोतील एका खबऱ्याकडून त्याच्या घरा जवळील काही मुलं रोजच नवीन कपडे घालणाऱ्या मुलांकडे असलेल्या रेडीमेड कापड दुकानाच्या पिशव्यांवरुन संशय येऊन त्याने पोलिसांना खबर कळवली. पोलिस नाईक तेजस मराठे यांनी निरीक्षक अनिल भवारी यांना कळवले. तत्काळ भवारी यांनी पथक तयार करून तपासचक्रे गतिमान करीत गुन्हे शोध पथकाने पिंप्राळा हुडकोतून एका संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिसांनी धाक दाखवताच त्याने तांबापुरातील इतर साथीदारांची नावे पुढे आल्याने पोलिसांनी तांबापूरा भागातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या दोघांवर जिल्हा पेठ आणि रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

साडे सहा किलो चांदी

पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांकडून साडे सहा किलो चांदी हस्तगत केली. चोरीतील साडेसहा किलो चांदीचे दागिने काढून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT