Women farm laborers planting cotton in Shiwar. esakal
जळगाव

Jalgaon Cotton Farming : पाचोरा तालुक्यात 45 हजार हेक्टरवर कापसाचा पेरा; खरीप हंगामाची बळीराजाला उभारी

Cotton Farming : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाबाबत सुरुवातीपासूनच अनुकूल वातावरण असल्याने बळीराजाला चांगलीच उभारी मिळाल्याचे चित्र दिसतेय.

प्रा. सी. एन. चौधरी

Jalgaon Cotton Farming : तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाबाबत सुरुवातीपासूनच अनुकूल वातावरण असल्याने बळीराजाला चांगलीच उभारी मिळाल्याचे चित्र दिसतेय. तालुक्यात यंदा सुमारे ६० हजार खरीप लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यात सुमारे ४६ हजार हेक्टर कापूस लागवडीचे क्षेत्र व त्या खालोखाल मक्याची लागवड होणार आहे. यंदा प्रचंड उष्णता व कृषी विभागाच्या निर्देशानुसार कापसाची लागवड २० मेपासून सुरू न होता १ जूनपासून प्रारंभ झाला आहे. (Sowing cotton on 45 thousand hectares in Pachora district )

त्यामुळे उत्पादन लांबण्याची भीती प्रथमपासूनच निर्माण झाली आहे. भविष्यात पावसाचा लहरीपणा व रोगराईची भीतीही व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे ४५ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. उत्पादनही चांगले आले. मात्र, कापसाला भाव न मिळाल्याने यंदा कापूस लागवडीचे क्षेत्र घटेल, असे बोलले जात होते.

कापसाच्या भावाचा मुद्दा

गेल्या खरीप हंगामात पावसाचा लहरीपणा कायम राहिला. तरीही समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. तीच परिस्थिती रब्बीची राहिली. मात्र, शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने बळीराजाची आर्थिक विवंचना कायम आहे. बहुतांश शेतकऱ्यांना मागील नुकसानभरपाई अजूनही न मिळाल्याचे बोलले जात आहे.

यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने बियाणे, खते, कीटकनाशके पुरवठा व विक्रीसंदर्भात सुयोग्य नियोजन केले आहे. शेतकऱ्याची फसवणूक व पिळवणूक होऊ नये, म्हणून भरारी पथके तैनात केली आहेत. (latest marathi news)

कपाशीच्या बियाण्यांची अडीच लाख पाकिटे

कापूस लागवडीचे ४६ हजार क्षेत्र लक्षात घेऊन बियाण्यांच्या २ लाख ५१ हजार ९७५ पाकिटांची उपलब्धता कृषी विभागातर्फे करण्यात येणार आहे. विशेषतः एचडीबीटी बियाणे घातक ठरविल्याने या बियाण्यांवर बंदी घातली आहे. या बियाण्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

खतांची मागणी २२ हजार टन

तालुक्यात खरीप हंगामासाठी २२ हजार ८०० टन खतांची मागणी केली आहे. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, एमओपी डीएपी, सर्व प्रकारचे एनपीके खतांचा त्यात समावेश आहे. खरीप पीककर्जासंदर्भात जिल्हा बँकेसह अन्य बँका, विकास सोसायटीतर्फे कर्जपुरवठ्याची व्यवस्था केल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

यंदा पावसाळा चांगला असेल, असे हवामान खात्याने वर्तविला असल्याने खरीपासह रब्बी उत्पादन देखील चांगल्या प्रकारे हाती येऊन बळीराजा आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर निघणे शक्य होईल, अशी आशा व्यक्त होतेय.

''यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सर्वसमावेशक असे नियोजन केले असून हे नियोजन यशस्वी करण्याचे प्रयत्न आहेत. खते , बी बियाणे , कीटकनाशके , शेतीचे अवजारे या संदर्भातील नियोजनाद्वारे शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक थांबेल. तसेच भरारी पथके सर्व गैरप्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. काही तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.''- रमेश जाधव (तालुका कृषी अधिकारी )

''यंदाच्या खरीप हंगामातही कापूस लागवडीचे क्षेत्र विक्रमी आहे. त्या खालोखाल मक्याची लागवड होत आहे. कृषी विभागाने यंदा शेतकरी हितार्थ नियोजन केले असले तरी लिंकिंग , जादा भावात विक्री हे प्रकार छुप्या पद्धतीने सुरूच आहेत. त्याकडे कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन न्याय द्यावा.''- शशिकांत पाटील (शेतकरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT