Sureshdada Jain esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मोदी... विकासाचे गुजरात पॅटर्न, विकसित भारत अन्‌ सुरेशदादांची भूमिका

Lok Sabha Election : शिवसेना ‘उबाठा’ पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत प्रचार संपता संपता भाजपच्या दोन्ही उमेदवारांना समर्थन दिले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : जळगावच्या राजकारणातील ‘दादा’ म्हणून ज्यांचा उल्लेख व्हायचा व होतो त्या सुरेशदादा जैन यांनी ऐन लोकसभा निवडणुकीतील मतदानावेळी शिवसेना ‘उबाठा’ पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत प्रचार संपता संपता भाजपच्या दोन्ही उमेदवारांना समर्थन दिले. दादांनी दबावामुळे ही भूमिका घेतल्याचा आरोप होत असला, तरी कुणाच्या दबावाला बळी पडतील, अशी त्यांची ओळख मुळीच नाही. (sureshdada jain resigned from membership and supported both BJP candidates )

शिवाय, तत्कालीन ‘सीएम’ म्हणून नरेंद्र मोदींच्या गुजरात विकास पॅटर्नचे ते नेहमीच चाहते राहिलेय, म्हणूनही मोदींच्या विकासाच्या व्हीजनचे सुरेशदादांनी समर्थन करण्यात आश्‍यर्चकारक असे काहीच नाही. जळगाव शहरातून २०१४ ची विधानसभा निवडणूक हरल्यानंतर सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. २०१८ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी तत्कालीन शिवसेनेच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले होते व त्यांच्यामागे पाठबळही उभे केले होते.

मात्र, नंतरच्या टप्प्यात राजकारणाशी संबंधित कुठल्याही पातळीवर त्यांचा कधीही संबंध आला नाही किंवा त्यांनी तो येऊ दिला नाही. न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ते जळगावात आले होते, तेव्हा त्यांचे रेल्वेस्थानकावर भव्य स्वागत झाले. त्यांच्या आगमानाचा ‘इव्हेंट’चा साजरा झाला. त्यावेळी त्यांना मिळालेल्या प्रतिसादावरून अनेकांनी ते पुन्हा एकदा राजकारणाचा डाव खेळतील, अशी शक्यताही वर्तविली होती. मात्र, दादा या शक्यता, चर्चेपासून दूरच राहिले.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील शिक्षेनंतर जैन राजकीयदृष्ट्या ‘बॅकफूट’वर गेले. ते आजपर्यंत ‘फ्रंटफूट’वर आलेच नाहीत. एवढे असूनही सुरेशदादा केव्हाही जळगावात आले आणि एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात गेले, तर त्यांच्याभोवती कार्यकर्ते, समर्थकांचे मोठे मोहोळ जमा होते, हेही सर्वश्रूत आहे. राजकारणात गेल्या दहा वर्षांपासून ते कुठल्याही पदावर नसले, तरी जळगावच्या समाजकारणावर त्यांचा प्रभाव आजही आहे. त्यामुळेच सुरेशदादांची कुठलीही कृती थेट जळगावच्या जनमतावर परिणाम करते, याबद्दल कुणाचे दुमत नसावे. (latest marathi news)

अशा सुरेशदादांनी काल-परवा अचानक शिवसेना ‘उबाठा’ पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इतक्या वर्षांत त्यांना तो द्यावा वाटला नाही आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याच्या दोन-चार दिवस आधीच त्यांनी तो दिल्यामुळे ते भाजपत प्रवेश करणार का, असा प्रश्‍न उपस्थित झाला. मात्र, त्यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात त्यांनी राजकीय निवृत्तीचा उल्लेख केल्याने त्यांचा भाजप प्रवेशाचा मुद्दाही बाद होतो.

अशात त्यांनी कोणतीही भूमिका घेऊ नये आणि घरीच बसावे, असा अर्थ घेणेही चुकीचे ठरेल. कारण, शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देताना त्यांनी जळगाव शहर, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासासासाठी आपण समाजकारणात मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहू, असेही स्पष्ट केले आहे. या सर्वांगीण विकासासाठी त्यांची काहीतरी भूमिका नक्कीच असू शकते आणि तीच भूमिका त्यांनी शनिवारी लोकसभा निवडणुकीचा या क्षेत्रातील प्रचार संपण्याआधी जाहीर करत भाजपच्या उमेदवारांना समर्थन दिले.

त्यांच्या या भूमिकेचा अनेकांना धक्का बसला. विशेषत: शिवसेना ‘उबाठा’तील त्यांच्या समर्थकांची चांगलीच पंचाईत झाली. ‘उबाठा’च्या संपर्कप्रमुखांनी तर सुरेशदादांनी दबावात हे केल्याचा आरोपही करून टाकला. मात्र, ज्यांनी सक्रिय राजकारणातील सुमारे चार दशकांत कधी, कुणापुढेही वाकण्याची भूमिका घेतली नाही, तत्वांशी तडजोड केली नाही, ते दादा कुणाच्या दबावाला बळी पडतील, असे वाटत नाही. निडर, स्पष्टवक्तेपणामुळे अनेक जण त्यांच्यापासून दुखावले, दुरावले.

मात्र, त्यांनी त्याची कधी तमा बाळगली नाही, ते सुरेशदादा कुणी काही सांगेल, म्हणून ते करतील, असेही नाही. शिवाय, त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर करताना मोदींच्या विकासाच्या व्हीजनचे कारण पुढे केले आहे. मोदींचा दादांवरील प्रभाव काल- परवाचा नाही. त्याला २००१ ची पाश्‍र्वभूमी आहे. त्यावेळी गुजरातच्या भूजमध्ये प्रलयकारी भूकंप झाला होता.

सुरेशदादांनी खानदेश ट्रस्टच्या माध्यमातून भूकंपग्रस्तांसाठी मोठा निधी उभारला व गुजरात सरकारला देऊ केला. त्यावेळेपासून ते तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदींच्या कार्याने प्रभावित होते. मोदींनीही दादांच्या भूजमधील मदतीचे कौतुक केलेय. मोदींच्या त्यावेळच्या गुजरात विकास पॅटर्नला आणि आताच्या ‘विकसित भारत’ला दादा पाठिंबा देत असतील, त्यात आश्‍चर्यकारक असे काही नाहीच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT