Summer Health Care esakal
जळगाव

Summer Health Care : उन्हाळ्यात त्वचा, डोळ्यांची घ्या काळजी; नेत्रतज्ज्ञांचा सल्ला

Summer Health Care : जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचे तापमान ४२ अंश आहे. प्रखर उन्हात सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेवर पडतात.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचे तापमान ४२ अंश आहे. प्रखर उन्हात सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेवर पडतात. त्यामुळे त्वचेमध्ये सुरकुत्या येऊन त्वचा लवकर वयस्कर होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये ‘मेलेनिन’ जे संरक्षणाचे काम करते, त्याच्याच कार्यामध्ये या कडक सूर्यप्रकाशामुळे अडथळा येतो. (Jalgaon Take care of skin, eyes in summer)

त्यातून त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. उन्हाळ्यात वेळीच काळजी घेत डोळ्यांची निगा राखल्यास उन्हाळा सूसह्य होईल, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. डोळ्यांचे विकार जसे डोळे लाल होगे, दुखणे, मोतीबिंदू लवकर होण्याचे प्रमाण वाढते. जीवनसत्व ‘अ’चे प्रमाण कमी होऊ शकते. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेद्र पाटील म्हणाले, तीव्र उन्हामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो.

याचरोबरच लघवीला जळजळ होवू शकते. जास्त उन्हामुळे रक्तदाब कमी होवून भोवळ येणे, चक्कर, मेंदूला रक्तपुरवठा कमी होणे अशा गंभीर स्वरुपाच्या बाबी घडू शकतात. लोणकड तूप करताना जे ताक निर्माण होते त्या ताकाचे किंवा त्यापासून बनवलेल्या मठ्ठ्याचे, लस्सीचे सेवन उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी फायद्याचे ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात दही टाळलेले बरे. शीतपेय कर्बोदीक युक्त पेय आणि रस्त्यावरील गाडयावरील कृत्रिम रसायन टाकून केलेले पेय टाळलेले बरे. उन्हाळ्यामध्ये पाचक अग्नी कमी झालेला असतो त्यामुळे जेवणाच्या आधी एकदम थंड पाणी पिऊ नये. जेवताना मध्ये थोडे, थोडे पीत जेवण करावे. अशाप्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेवू शकतो.(latest marathi news)

अशी घ्या काळजी

* उन्हात जाण्यापूर्वी हात व पाय पूर्ण झाकतील असे सुती कपडे

* डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल वापरा

* त्वचेवर सनस्क्रीन लोशनचा वापर करा

"कडक उन्हातून घरात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. प्रथमतः शरीराला घराच्या तापमानाशी थोडे अनुकूल होऊ द्यावे. त्यानंतर काही मिनिटे बसून घ्यावे. त्यानंतरच पाणी, सरबत असे पेय घ्यावे. फ्रिजचे पाणी टाळावे. बर्फसुद्धा निषिद्ध आहे. माठातील थंड पाणी आरोग्यास लाभदायी असते. माठामध्ये वाळ्याची पुरचुंडी टाकली तर वाळ्याच्या शीत गुणामुळे जी शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यावर प्रतिबंध होतो." - डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT