thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बँक व्यवस्थापकास लुटणारे दोघे गजाआड; डोळ्यात मिरची पूड टाकून 60 हजार लंपास

Jalgaon Crime : बँक व्यवस्थापकाची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील बँकेची साठ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी एकच्या सुमारास हिंगणे (ता. जामनेर) गावाजवळ घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बँक व्यवस्थापकाची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून तसेच डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील बँकेची साठ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी एकच्या सुमारास हिंगणे (ता. जामनेर) गावाजवळ घडली. दरम्यान, पोलिसांनी शिताफीने तासाभरात गुन्ह्याचा छडा लावत दोन संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४८ हजाराच्या रकमेसह मुद्देमाल हस्तगत केला आहे. ( to who robbed bank manager are arrested by police )

आयएफडीसी बँकेचे व्यवस्थापक सागर हिरासिंग चव्हाण हे हिंगणे बुद्रुक येथून कर्जाच्या हप्त्याचे साठ हजार रुपये गुरुवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास बॅगमध्ये घेऊन जात होते. दरम्यान, दुचाकीवरील दोन भामट्यांनी व्यवस्थापक चव्हाण यांचा पाठलाग करून त्यांची दुचाकी अडविली व चाकूचा धाक दाखविला. तसेच डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांच्याकडून ६० हजार रुपये पळवून नेले होते.

याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलिस पथकाने संशयिताचा पाठलाग करून हिंगणे, गाडेगाव येथील जंगलात मोठ्या शिताफीने एका तासात संशयितांना पकडून गजाआड केले. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ४८ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

व्यवस्थापक हिरासिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांचे वर्णन व तांत्रिक तपासाच्या आधारे जामनेर पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संशयितांचा छडा लावला. गंभीर स्वरूपाचा जबरी चोरीचा गुन्हा एका तासात उघड करून आरोपींना मुद्देमालासह अटक केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर- पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येकळे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे, पोलिस कर्मचारी अतुल पवार, गणेश भावसार, सागर पाटील, जितेंद्र ठाकरे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT