Materials stolen by thieves in Ishwar Vanjari's house and thrown away.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घराचे कुलूप तोडून 3 लाखांचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगर येथे घडली.

दरम्यान, शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दोन दिवसांपूर्वीच मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचे मोबाईल चोरून नेले होते. (Jewellery worth 3 lakhs were looted robbery jalgaon crime news)

याबाबत माहिती अशी, गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगरातील रहिवासी ईश्वर पंडीत वंजारी हे काही दिवसांपासून जळगाव येथील महाबळ परिसरातील विवेक कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी (ता. ६) सकाळी ईश्वर वंजारी यांचा मुलगा सौरभ हा एरंडोल येथील घरी आला.

घराची साफसफाई करून घराला कुलूप लावून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जळगावला आला. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाट तोडून त्यातील सुमारे तीन लाख रुपयांचे

सोन्याचे दागिने लंपास केले. आज पहाटे सहाच्या सुमारास या भागातील रहिवासी अजय मराठे यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित ईश्वर वंजारी यांना मोबाईलवरून कळवले. त्यानुसार, ईश्वर वंजारी एरंडोल येथे घरी आले असता, घरातील सर्व साहित्य अस्त्यावस्त दिसून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घरातून ३५ ग्रॅमची सोन्याची पोत, वीस ग्रॅमच्या बांगड्या, पंधरा व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व इतर दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. या दागिन्यांची बिले न सापडल्यामुळे पोलिसात केवळ पाच ग्रॅम सोने चोरीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत ईश्वर वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल पाटील तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरात दोनच दिवसांपूर्वी प्रमुख मार्गावरील शेतकी संघाच्या व्यापार संकुलातील मोबाईलच्या दुकानातून तीन लाखांच्या १९ मोबाईलसह रोख रक्कम लंपास केली होती. दोन दिवसात या दोन मोठ्या चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT