physical abuse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 5 वर्षांनंतर खटल्याचा निकाल; आरोपीला 7 वर्षे सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दुपारच्या सुमारास झोपलेल्या महिलेच्या (Women) घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. (Judgment of Physical abuse case after 5 years Accused sentenced to rigorous imprisonment for 7 years jalgaon news)

दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी किशोर कडू ढगे याच्याविरुद्ध जिल्‍हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावासाची सोमवारी शिक्षा सुनावली.

एरंडोल पोलिस ठाण्याच्या हद्दीत, तसेच तालुक्यातील एका गावात पीडिता वास्तव्यास असून, (ता. २ मार्च २०१८) घरात झोपलेली असताना किशोर ढगे हा तिच्या घरात जबरदस्तीने शिरला. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

त्यानंतर ही घटना कोणाला सांगितल्यास पुन्हा शारीरिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

खटल्याचे कामकाज जिल्हा अति सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांच्या न्यायालयासमोर सुरू होते. सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले.

साक्षीदारांच्या साक्ष, प्राप्त पुरावे आणि पोलिस तपासात संशयिताविरुद्ध दाखल गुन्ह्यातील दोषारोप सिद्ध झाल्याने किशोर ढगे याला दोषी ठरवीत त्याला सात वर्ष सश्रम कारावास आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षाकडून अति. शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी म्हणून हर्षवर्धन सपकाळे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT