jupiter venus planets conjunction
jupiter venus planets conjunction esakal
जळगाव

Jupiter Venus Conjunction : सूर्यास्तानंतर अद्‌भुत खगोलीय घटना दिसणार!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पश्चिम दिशेला बुधवारी (ता. १) सूर्यास्तानंतर साधारण दीड तास गुरू आणि शुक्र (Venus) ग्रहांच्या ‘महायुती’चे (Great Conjunction) अद्‌भूत दृश्‍य बघायला मिळणार आहे. (Jupiter Venus alliance spectacular sight on Wednesday will see celestial phenomenon after sunset jalgaon news)

आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि सगळ्यात तेजस्वी दिसणारा शुक्र ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. साध्या डोळ्यांनी तर ते दिसतीलच; पण टेलिस्कोपमधूनही गुरू, त्याच्या चार चंद्रांसह आणि शुक्र यांना एकाच वेळी बघण्याचा आनंद खगोलप्रेमींना घेता येणार आहे.

युती आणि महायुती

ज्यावेळी दोन ग्रह किंवा चंद्र आणि ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला ‘युती’ (Conjunction) असे म्हणतात, पण महायुतीत ते एकमेकांच्या खूपच जवळ आलेले म्हणजे एकमेकांना चिटकल्यासारखे वाटतात त्याला ‘महायुती’ (Great Conjunction) म्हणतात.

प्रत्येक ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या अंतरावरून आणि वेगवेगळ्या वेगाने फिरत असल्याने त्यांना आपली प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळा काळ लागतो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शुक्र हा गुरूच्या मानाने सूर्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग जास्त असल्याने शुक्र गुरूला पार करून पुढे जातो. या पार करण्याच्या वेळी पृथ्वी, शुक्र आणि गुरू एका सरळ रेषेत येतात. आपण त्यांना पृथ्वीवरून बघत असल्याने ते आपल्याला एकमेकांच्या जवळ आले आहेत, असा भास होतो आणि आपल्याला महायुतीचे अद्‌भुत दृश्य बघायला मिळते.

सर्व खगोलप्रेमींना या खगोलीय व अदभूत घटना बघण्याचा आनंद घेता यावा, यासाठी मु. जे. महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या गच्चीवर जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु. जे. महाविद्यालय, भूगोल विभागातर्फे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खगोलप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अभ्यासक अमोघ जोशी व प्राचार्य एस. एन. भारंबे यांनी केले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT