kbcnmu award 2023 goes to experimental farmer Hemchandra Patil jalgaon news esakal
जळगाव

KBCNMU Award 2023 : यंदाचा बहिणाबाई पुरस्कार हेमचंद्र पाटील यांना; प्रयोगशील शेतीचा होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा

KBCNMU Award 2023 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ चा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार पंचक (ता. चोपडा) येथील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे.

या वर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी देण्यात येत असून, ११ ऑगस्टला विद्यापीठ नामविस्तार दिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

दोन वर्षांपासून विद्यापीठाने राज्य पातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार सुरू केला आहे. (kbcnmu award 2023 goes to experimental farmer Hemchandra Patil jalgaon news)

या वर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी जाहीर झाला होता. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागविले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

समितीने केली निवड

भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मुंबई विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रा. संजय देशमुख यांचा या समितीत समावेश होता.

समितीने पंचक गावातील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र दगाजी पाटील यांच्या निवडीची शिफारस केली असून, कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी ही शिफारस मान्य केली आहे.

५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ११ ऑगस्टला माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. याच समारंभात विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांना पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रयोगशील शेतकरी म्हणून लौकिक

हेमचंद्र पाटील यांचे बी.एस्सी., एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण झाले आहे. पंचक येथे ४० एकर बागायती शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत. त्याबरोबरच दुग्ध उत्पादनाचा पूरक व्यवसायही आहे. कांद्याची गादी वाफ्यावर लागवड करून मायक्रो स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करून ६० टक्के पाण्याची बचत करीत विक्रमी उत्पादन घेतले.

उती संवर्धित केळीलागवड करून ३० महिन्यांत केळीची तीन पिके घेऊन हेक्टरी १०० टनापर्यंत उत्पादन घेतले. डाळिंब, हळद, अद्रक, काकडी, कलिंगड यांसारख्या विविध पिकांचे विक्रमी उत्पादन हेमचंद्र पाटील यांनी घेतले आहे. त्यांनी शेडनेट हाऊस उभारले.

शेती व्यवसाय करताना कृषी प्रदर्शन, कृषी मेळावे या ठिकाणी व परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात. इंटरनेट आणि सोशल मीडियावरून शेतीमालाच्या बाजारभावाविषयी माहिती गोळा करून ते शेतकऱ्यांना देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT