kirankumar bakale esakal
जळगाव

Kirankumar Bakale Controversy : बकाले अद्याप अटकेपासून दूरच; महाजनच्या अटपुर्वजामिनावर युक्तिवाद पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मराठा समाजाप्रती अक्षेपार्ह्य वक्तव्य केल्या प्रकरणात निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असून त्याच गुन्ह्यातील संशयित अशोक महाजन याच्या अटकपूर्व जामीनावर जिल्हा न्यायालयात आज (ता. १) युक्तिवाद पूर्ण झाला.

स्थानिक गुन्हेशाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याच्यावर दाखल गुन्ह्यात जिल्‍हा न्यायालया पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दोन स्वतंत्र पथके त्यांच्या मागावर होती. मात्र आजपर्यंत त्यांना अटक होवू शकली नाही.(Kirankumar Bakale Controversy Bakale still far from arrest Arguments on Mahajan anticipatory bail completed Jalgaon News)

तर, वादग्रस्त संभाषणात सहभागी अशोक महाजन या हजेरी मास्तरकडून अटकपूर्व जामिनासाठी जिल्‍हा न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. त्यावर न्या. माने यांच्या न्यायालयात बचाव पक्षासह सरकारपक्षाचा आज पुन्हा प्रदीर्घ युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद पूर्ण होवुन न्यायालयाने प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून उर्वरित कामकाज २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी सरकारपक्षातर्फे तर, ॲड.केदार भुसारी बचाव पक्षातर्फे कामकाज पाहत आहेत.

अटकेपासून लांबच

मराठा समाजातर्फे निलंबित पोलिस निरीक्षक बकाले यांच्या अटकेसाठी प्रदीर्घ आंदोलने झालीत. जिल्हा न्यायालयानंतर उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतरही त्यांना पोलिस अटक करू शकलेले नाही. आता बकालेंतर्फे जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याची चर्चा असून ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्याच असल्याने तद्नंतरच या बाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT