kirankumar bakale esakal
जळगाव

Kirankumar Bakale Controversy : बकालेंच्या अटकेचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानंतर औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला आहे.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयास बकाले यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात येऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला.(Kirankumar Bakale Controversy Case Bench rejected the pre arrest bail application Jalgaon News)

दोघा बाजूंनी प्रभावी युक्तिवाद
जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज खंडपीठाने, बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
मराठा समाजातर्फे जल्लोष
खंडपीठाने बकाल यांचा अटकपूर्व जामीन फेटल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांतर्फे जल्लोष करण्यात आला. फिर्यादी विनोद देशमुख यांनी देखील याबाबतची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केली आहे.
अटकेचा मार्ग मोकळा
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांनी बकाले यांच्या शोधार्थ तीन पथकांची नेमणूक केली होती. यातील दोन पथके नुकतीच रिकाम्या हाती परत आली होती. आता खंडपीठाने जामीन फेटाळल्यानंतर बकाल यांच्या अटकेसाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान, मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण अद्यापही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT