Vaishali Suryavanshi, leader of the Thackeray faction, waving to Shiv Sena Shinde faction MLA Kishore Patil on the occasion of brother-in-law. 
जळगाव

Bhaubeej 2023: बहीण-भावाच्या पवित्र नात्यापुढे राजकीय विरोध फिका! किशोर पाटील अन् वैशाली सूर्यवंशी यांची भाऊबीज

प्रा. सी. एन. चौधरी

Bhaubeej 2023 : कुटुंब व समाजात रक्ताची नाती कितीही ताणली गेली तरी सणासुदीला व संकटसमयी ही नाती वृद्धिंगत होऊन एकमेकांच्या मदत व सहकार्यासाठी उभी राहतात.

नातेसंबंधातील व्यक्तींमधील राजकीय, आर्थिक विरोध कितीही विकोपाला गेले तरी पवित्र नाते मात्र कायम राहते, याची प्रचिती पुन्हा एकदा भाऊबीज सणानिमित्त पाचोरावासीयांना आली. (Kishor Patil and Vaishali Suryawanshi celebrated bhaubeej jalgaon news)

अलीकडच्या काळात एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनलेले आमदार किशोर पाटील व शिवसेना गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी हे भाऊबीज सणानिमित्ताने काही वेळ का असेना एकत्र आले. ताईंनी भाऊ आप्पांना ओवाळले तर भाऊ आप्पांनी भाऊबीज भेट देऊन ताईंचा चरणस्पर्श करत आशीर्वाद मिळवला.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या चुलत भगिनी व माजी आमदार (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या कन्या व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यातील राजकीय वैर दिवसागणिक विकोपाला जात असले तरी रक्षाबंधन व भाऊबीज सणानिमित्त एकत्र येण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची परंपरा मात्र कायम असल्याचे स्पष्ट झाले.

भाऊबीज सण असल्याने बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास आमदार किशोर पाटील हे बहीण वैशाली सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. वैशाली सूर्यवंशी यांनीही हसतमुखाने त्यांचे स्वागत केले.

दिवा ओवाळत, कपाळी टिळा लावत, पेढा भरवत भाऊबीजनिमित्त राजकीय विरोधक असलेल्या भावाची ओवाळणी केली. आमदार किशोर पाटील यांनी बहिणीचा चरणस्पर्श करून भाऊबीजेची भेट दिली व हसतमुखाने ते माघारी परतले. बहीण-भावाच्या पवित्र नात्यात राजकीय विरोध अखेर फिका पडला. भाऊ- बहिणीच्या या भाऊबीजेची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal sports minister resigns : कोलकातामध्ये मेस्सीच्या कार्यक्रमात उडालेल्या गोंधळानंतर अखेर बंगालचे क्रीडामंत्र्यांनी दिला राजीनामा!

IPL 2026 Auction live : Mumbai Indians ची अन्य फ्रँचायझीकडून होतेय कोंडी! आकाश अंबानींच्या चेहऱ्यावर निराशा... Memes Viral

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Mumbai: आता ऑनलाइन अपॉइंटमेंट, आरोग्य माहिती आणि प्रमाणपत्रे एका नंबरवर मिळणार! बीएमसीकडून हेल्थ चॅटबॉट सेवा सुरू, नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT