Crime news esakal
जळगाव

खंडणीसाठी चहा-नाश्ता विक्रेत्यावर चाकू हल्ला; गावगुंडांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत एमआयडीसीत चहा-नाश्ताची गाडी लावणाऱ्या विक्रेत्याला दोन जणांनी चाकूने भोसकून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अयोध्यानगर येथील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (वय ३५) एमआयडीसीतील (व्ही सेक्टर) येथे नाश्ता तसेच चहा विक्रीची गाडी लावतात. त्यावर उदरनिर्वाह भागवतात. बुधवारी (ता. १) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहुल रामचंद्र बऱ्हाटे व गणेश अर्जुन कोळी असे दोघेही शिवनाथ शिंदे यांच्या गाडीजवळ आले. दुकान चालवायचे असेल तर, आम्हाला हप्ते द्यावे लागतील असे, म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्याचा राग आल्याने गणेश कोळी याने शिवनाथ यांना पकडून ठेवले तर राहुल रामचंद्र बऱ्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूने वार केले. शिवनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल बऱ्हाटे व गणेश कोळी (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही भामट्यांना अटक

चाकू हल्ला होताच परिसरातील पोलिसमित्र युसूफ खान व राजू पटेल अशा दोघांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले. एमआयडीसी पोलिसांना मोबाईलवरून माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, हल्लेखोर पसार झाले होते. चाकू हल्ल्यातील दोघे संशयित भोलाणे येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुकेश पाटील अशांच्या पथकाने दोघांना अटक केली. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्याची कोठडीत रवानगी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT