Sankalp Chitra and MLA Kishore Patil of Krishna Park. esakal
जळगाव

Jalgaon News : बहुळा धरणावर साकारणार कृष्णा पार्क! 5 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : बिल्दी (ता. पाचोरा) गावाजवळ उभारण्यात आलेल्या बहुळा धरणास आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून गेल्यावर्षी 'कृष्णा सागर' असे नाव देण्यात आले असून, या धरणाच्या परिसरात आता 'कृष्णा पार्क' साकारले जात आहे.

त्यासाठी आमदार किशोर पाटील यांचे प्रयत्न व पाठपुराव्यातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (ता. २०) होत आहे. (Krishna Park will be built on Bahula Dam 5 crore fund approved kishor patil Jalgaon News)

शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत कृष्णा पार्कसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. २०) सकाळी दहाला होणार होत आहे.

या कामानिमित्ताने आमदार किशोर पाटील यांनी वचनपूर्ती केली असून, या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल,

कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार येळाई, तहसीलदार कैलास चावडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पदमसिंग पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, उद्योजक मुकुंद बिल्दीकर,

माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, बाजार समितीचे माजी प्रशासक चंद्रकांत धनवडे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील, अनिल पाटील, राजेंद्र तायडे, माजी नगरसेवक डॉ. भरत पाटील, भाजपचे माजी शहरप्रमुख नंदू सोमवंशी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पाटील, सुभाष तावडे, माजी नगरसेवक नसिर बागवान, अय्यूब बागवान, प्रवीण ब्राह्मणे, इंदल परदेशी, भय्यासाहेब पाटील, संजय देवरे उपस्थित राहणार आहेत. परिसरातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण

या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या निधीतून निर्माण होणाऱ्या कृष्णा पार्कमध्ये निसर्गरम्य घाट, बगीचा, बोटिंग, खेळणी, प्रशस्त बैठक व्यवस्था आदी कामे होणार असून, संपूर्ण परिसर पर्यटन केंद्राच्या अनुषंगाने विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी कृष्णा पार्क विशेष आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT