raimond
raimond esakal
जळगाव

Jalgaon News : रेमंड कामगारांचा रोजगार अडकला टाळेबंदीत!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रेमंड वस्त्रोद्योग लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या जळगाव युनिटमध्ये २४ फेब्रुवारीपासून कामगार आणि व्यवस्थापनाचा वाद सुरू आहे.

काही कामगारांनी (Worker) वेतनवाढ मान्य नसल्याचे कारण पुढे करत कामबंद पाडले होते. (Labor and management dispute in Raymond Vastrodyog Limited employment of workers is stuck in layoffs jalgaon news)

त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले आहे. कामगारांचा रोजगार टाळेबंदीत अडकला आहे. टाळेबंदीचा बुधवारी (ता. १) पाचवा दिवस होता.

दरम्यान, कंपनीच्या ५० मीटर परिघात बेकायदेशीर जमाव गोळा करू नये, कुणीही गर्दी करू नये, असे औद्योगिक न्यायालयाचे आदेश असतानाही खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेचे अध्यक्ष व माजी महापौर ललित कोल्हे व पाच ते सहा जणांनी गर्दी जमवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी (ता. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास कंपनीचे प्रभारी मुख्य प्रबंधक प्रफुल्ल दत्तात्रय गोडसे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

श्री. गोडसे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ललित कोल्हे व पाच ते सहा जण मंगळवारी दुपारी एकला रेमंड कंपनीच्या ५० मीटरच्या आत येऊन कामबंद आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. गैरकायद्याची मंडळी जमवून घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे मुख्य सुरक्षा अधिकारी गिरधारी कुर्वे यांनी मला कळविले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यानंतर श्री. कुर्वे यांनी श्री. कोल्हे यांना समजावून कंपनीच्या ५० मीटर बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर आपण कुठलेही आंदोलन करीत नसल्याचे सांगत कोल्हे व इतर लोक ५० मीटरच्या आतच थांबून राहिले. हा प्रकार कुर्वे यांनी मला कळविला. त्यानंतर आपण एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मंडळी जमविल्याप्रकरणी कोल्हेंसह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रोजगार अडकला कुंपणात

रेमंड वस्त्रोद्योग कंपनीतील अडीचशेवर कामगारांनी २०२३ ची प्रस्तावित वेतनवाढ अमान्य असल्याचे कारण पुढे करत कामबंद पाडले होते. कंपनी व्यवस्थापनाने पहिल्याच दिवशी कामबंद पाडणाऱ्या दहा कामगांवर गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे औद्योगिक न्यायालयाकडून इंजक्शन ऑर्डर मंजूर करवून घेतली.

त्यात नमूद केल्याप्रमाणे कंपनीच्या ५० मीटर परिघात जमावबंदीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर जिल्‍हा प्रशासनाने २०० मीटर परिघात कलम १४४ लागू केले आहे. पाच दिवसांपासून कामबंद असल्याने रेमंड कंपनीच्या कामगारांचा रोजगार कायमचाच जातो, की यावर तोडगा निघेल, याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT