Concrete mixer that caused the accident.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : काँक्रिट मिक्सरचालकाने मजूरला चिरडले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पिंप्राळा स्मशाभूमीजवळ गुरुवारी (ता. ३०) काँक्रिट मिक्सर वाहनाच्या मागील चाकाखाली आल्याने मजूराचा दबून मृत्यू झाला. अरुण वसंत बाविस्कर (वय ४४, रा. कांचननगर) असे मृताचे नाव आहे. (Laborer crushed by concrete mixer operator jalgaon crime news)

पिंप्राळा स्मशानभूमीजवळ रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. तेथे अरुण बाविस्कर काम करीत होते. गुरुवारी सकाळी दहाला काँक्रिट मिक्सर वाहन (एमएच १९, डीयू ४६६१)चालक संजय राठोड (रा. रामदेववाडी, जळगाव) वाहन मागे घेत असताना, अरुण बाविस्कर मागील चाकाखाली चिरडले गेले.

घटनेनंतर चालक वाहन सोडून पसार झाला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील, रेवानंद साळुंखे, विजय खैरे, विजय जाधव यांनी घटनास्थळी पोचले. कामगारांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल केला.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात चालक संजय राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मृताच्या पश्चात पत्नी सविता, तीन विवाहित मुली आणि सात वर्षाचा मुलगा शैलैश असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drought: पावसाअभावी भातपिके वाळू लागली; मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक

Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

SCROLL FOR NEXT