death
death  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील हनुमाननगरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यााच जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड, जि. धुळे, ह. मु. हनुमाननगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. (laborer died on spot after being hit by running train jalgaon news)

जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील हनुमान नगरात राजू पवार पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी (ता. ३१) रात्री आठला पिंप्राळा येथे काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते.

शिरसोली ते जळगावदरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक (४१५/२५ ते २७) च्या दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हर्शल पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मृताच्या मागे पत्नी मीनाबाई, मुलगा सुनील, एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT