Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : किरकोळ वादातून एका कामगाराचा खून

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. कालू सोनवणे (वय ३०, रा. दहिवद तांडा, शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातील कृष्णा जिनिंगमध्ये बाहेर जिल्ह्यासह राज्यातील मजूर काम करतात. ३१ डिसेंबरला रात्री नऊच्या सुमारास कालू सोनवणे याचा जिनिंगमधील बिहार प्रदेशातील मजुरांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. (Labourer killed in a petty dispute Jalgaon Crime News)

थोड्याच वेळात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. साधारण १५ ते १७ जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला झाल्याचे समजले. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लाकडी दांडा टाकला. यात तो जागीच कोसळला.

कालूची शारीरिक परिस्थिती पाहून सर्व संशयित जिनिंग सोडून फरारी झाले. कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांच्या शोधार्थ रात्रीच वेगवेगळ्या भागात पथके रवाना केली.

अनोरे, धानोरे, गारखेडा या भागांतील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. एकेक करून पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, पोलिस कर्मचारी विनोद संदानशिव, मिलिंद सोनार, हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील यांनी रात्रभर जंगलात शोध घेऊन संशयितांना ताब्यात घेतले. याबाबत सखाराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT