water pipeline broke esakal
जळगाव

Water Pipeline Leakage : गुड्डूराजानगरात गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील भिकमचंदनगर, गुड्डूराजानगर येथे महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याचे पाईप (Water Pipeline Leakage) फुटून लाखो लिटर्स पाण्याची नासाडी होत आहे.

गल्ली गल्लीतून पाणी साचलेले असून, सर्वत्र चिखल झाला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. (Lakhs of liters of water wasted due to leakage in Guddu Raja Nagar jalgaon news)

याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागात नागरिकांनी तक्रार केली आहे; परंतु यावर अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी गुड्डूराजानगर येथील नागरिकांनी केली आहे. महापालिकेने अमृत योजना अंतर्गत नागरिकांना नवीन नळ कनेक्शन दिलेले आहेत.

परंतु हे कनेक्शन देत असताना जुनी व नवीन पाईपलाईन काही ठिकाणी तुटलेली असून, पाईप गळतीमुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून अक्षरशः लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. त्यामुळे कॉलनीत ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचले आहेत. साचलेल्या पाण्यामुळे, चिखलामुळे मच्छर वाढले असून, आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

या अत्यंत संवेदनशील महत्त्वाच्या प्रश्‍नाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. नागरिकांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन पाईपलाईनची गळती त्वरित थांबवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काही तक्रारदारांनी दिला आहे. स्थानिक नगरसेवक आणि संबंधित विभागाने लक्ष घालून गुड्डूराजानगर येथील ही समस्या सोडवावी, अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT