Beating-to-police esakal
जळगाव

Latest Marathi News | चोर पकडायला गेलेल्या पोलिसालाच मारहाण

संशयित तरुणाची चौकशी केल्यावर शिवीगाळ करत पोलिसाला केली दमदाटी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बसस्थानकातून पाकीट चोरी करणाऱ्या संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच महिलेसह एका जणाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी घडली. यात पोलिस कर्मचारी जखमी झाला असून दोन जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

प्रवाशांच्या पाकीटावर मारत होते डल्ला
सिल्लोड (ता. औरंगाबाद) येथील डॉ. राहुल सांडू अग्रवाल (वय २८) हे दुपारच्या सुमारास बसस्थानकात असताना त्यांचे पाकीट चोरल्याची घटना घडली. त्यांनी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिस पथकातील जुबेर सिराज तडवी व अमित मराठे यांनी तत्काळ बसस्थानक गाठले. यावेळी एक अनोळखी तरुण व महिला गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे पाकीट लांबवित असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार पोलिस कर्मचारी तडवी यांनी त्या संशयित तरुणाची चौकशी केल्यावर त्याने तडवी यांना शिवीगाळ करून दमदाटी करीत त्याच्या महिला साथीदाराने तडवी यांच्या अंगावर धावून येत झटापट केल्याने तडवी यांचा सदरा फाटला. पोलिस कर्मचारी तडवी यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना दिली. त्यांनी महिला पोलिस भारती देशमुख व प्रतिभा पाटील यांना सोबत घेत घटनास्थळी दाखल झाले. संबंधित महिला व तो व्यक्ती जुबेर यांना मारहाण करीत होता.

महिलेसह संशयिताला अटक
मारहाण करणाऱ्यांकडून पोलिसांनी तडवी यांची सुटका केली. त्यानंतर त्या महिलेसह तरुणाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी केल्यावर त्यांनी गणेश चंद्रकांत आठवले (वय ३२, रा. शिवाजीनगर) व सरला पितांबर ठाकूर (वय २१, रा. विजयनगर, नाशिक) असे नाव सांगितले. त्यांनी डॉ. अग्रवाल यांच्या खिशातून पाकीट चोरल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यात ४ हजार ५०० रुपये चोरी झाले आहे. याप्रकरणी तडवी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT