Leopard esakal
जळगाव

Jalgaon Leopard Attack : जामदा शिवारात बिबट्याचा पशुसंहार; शेतातील जनावरांवर झडप

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Leopard Attack : बहाळ (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने (Leopard) काही दिवसांपूर्वी धुमाकूळ घातला होता. हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी या भागात पुन्हा बिबट्याचा संचार कायम आहे. (leopard killed 2 calves of farmer in jamada shivar jalgaon news)

दोन दिवसांपूर्वी बहाळ येथे एका वासराची शिकार केल्याची घटना घडली असताना शनिवारी (ता. ८) सकाळी जामदा शिवारात बिबट्याने एका शेतकऱ्याचे दोन वासरू फस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क आढळून आले आहेत. वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

जामदा (ता. चाळीसगाव) येथील नवेगाव भागातील रहिवासी विशाल अनंत राजपूत यांच्या शेतात बांधलेल्या मोठ्या गुरांपैकी दोन लहान वासरांवर बिबट्याने रात्री झडप घातली. या झडपेत बिबट्याने एका वासराचे पूर्ण पोट फोडून मांस बाहेर काढले तर दुसऱ्या वासराच्या मानेचा लचका तोडला. आज सकाळी शेतकरी शेतात गेले असता हा प्रकार लक्षात आला.

बहाळलाही वासरू फस्त

दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी बहाळ येथेही एक वासरू फस्त केल्याचा प्रकार घडला आहे. रामकृष्ण सुकलाल महाजन यांच्या शेतातील वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. बहाळ आणि जामदा शिवारात दोन दिवसात बिबट्याने तीन वासरुंची शिकार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तीन महिन्यांपूर्वी भऊर शिवारात उसाच्या शेतात मादी बिबट व तिचे दोन बछडे आढळून आले होते. त्यात बिबटने एक बछडे नेले होते तर दुसरे बछडे तिथेच होते. वन विभागाने हे बछडे ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

मात्र ती मादी बिबट आणि तिचा बछडा कुठे गेले याचा थांगपत्ता नसतानाच आता जामदा शिवरात आज सकाळी दोन वासरू फस्त केल्याचा प्रकार समोर आल्याने ती हीच बिबट तर नाही ना असा सवाल व्यक्त होत आहे.

बिबट्याचे पायाचे ठसे असल्याचा संशय

जामदा (ता.चाळीसगाव) येथील शेतकरी विशाल राजपूत यांनी या घटनेची महिती वन विभागाला दिली. घटनास्थळी तातडीने वन विभागाच्या वनरक्षक अश्विनी ठाकरे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याचे पगमार्क आढळून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मका काढणीचे कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

बिबट्यापासून संरक्षणाच्या उपाययोजना...

आपल्या शेतातील घरापासून २० ते २५ फूट अंतरावर पिकांची लागवड करणे. शेतात, घराजवळ पुरेसा उजेड ठेवणे. घराला व जनावरांच्या गोठ्याला अधिक उंचीचे कुंपण घालणे. जनावरे गोठ्यात बंदिस्त ठेवणे. घराच्या बाहेर पाळीव कुत्रे बांधून ठेवू नये, कारण कुत्र्याच्या वासाने बिबट्या घराकडे येतो.

मोकळे असलेले कुत्रे प्रतिकार करू शकतात. बांधलेले कुत्रे प्रतिकार करत नाही. परिणामी, त्याची शिकार करणे सहज सोपे जाते. वस्तीवर राहणाऱ्यांनी लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. शेतात लहान मुलांना घेऊन जाऊ नये.

बाहेर जाताना हातात मोठी काठी ठेवावी. या काठीला घुंगरू बांधावे. जेणेकरून बिबट्या पळून जाऊ शकतो. बिबट्या घराच्या आजूबाजूला आढळल्यास मोठ्या आवाजाचे फटाके वाजवावेत, तसेच इतर वस्त्यांवरील शेतकऱ्यांना सावधगिरी घेण्यासाठी तातडीने कळवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT