Jalgaon Crime news
Jalgaon Crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : वांजोळा येथे दारुची हातभट्टी उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : वांजोळा (ता. भुसावळ) येथील नाल्याच्या काठावर हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संयुक्त कारवाई करीत दारुची भट्टी उद्‌ध्वस्त केली. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

वांजोळा (ता. भुसावळ) गावातील नाल्याच्या काठावर गावठी दारुची भट्टी असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६.५५ च्या सुमारास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे, पोलिस नाईक यासीन पिंजारी, हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर, हवालदार विठ्ठल फुसे यांच्यासह आर.सी.पी. प्लॉटूनच्या कर्मचाऱ्यांनी अचानक वांजोळा गावी नाल्याच्या काठावर धडक दिली.

यावेळी घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा गूळ, मोह, नवसागर, कच्चे रसायनने भरलेले ड्रम व एक प्लॅस्टिक कॅन भट्टीच्या बाजूस लपवून ठेवलेले मिळून आले. याप्रकरणी संशयित आरोपी विजय सिताराम कोळी (वय ३२, रा. वांजोळा) हा एकूण सतरा हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी जगदीश भोई यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT