Lokesh Patil overcome Thalassemia and succeeds in Navodaya exam jalgaon news 
जळगाव

Jalgaon News : ‘थॅलेसेमिया’वर लोकेश पाटीलने केली मात; नवोदय परीक्षेत यश

उमेश काटे

Jalgaon News : ‘जिंदगी के इम्तेहान मे हमारे जैसा सौदागर नहीं... हम आंसू भी भुला देते है हमारी मुस्काराट दे कर..!’ या काव्य पंक्तीच्या माध्यमातून ‘थॅलेसेमिया’ या दुर्मीळ आजारावर मात करीत विद्यार्थ्याने मिळवलेले यश खरोखरच इतर विद्यार्थ्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरले आहे.

लोंढवे (ता. अमळनेर) येथील स्वर्गीय आबासाहेब एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील सहावीचा विद्यार्थी लोकेश पाटील या अतिशय गरीब कुटुंबातील मुलाने नवोदयच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.

मनात जिद्द अन चिकाटी असेल तर बुद्धिमत्तेच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे लोकेशने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. (Lokesh Patil overcome Thalassemia and succeeds in Navodaya exam jalgaon news)

‘थॅलेसेमिया’सारखा आजार देखील अडथळा करू शकला नाही. भुसावळ येथील नवोदय विद्यालयात त्याने प्रवेश मिळवला आहे. सहावीपासून पुढील शिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.

या परीक्षेत खूपच कमी विद्यार्थ्यांना यश मिळते. ‘थॅलेसेमिया’चा संघर्ष म्हणजे अतिशय जीवघेणा विषय. ज्या मानसिकतेतून लोकेशचे वडील दीपक पाटील आणि त्यांचे कुटूंबीय सध्या जात आहे, ते जीवन म्हणजे जिवंतपणी दररोज मरण अनुभवण्यासारथे आहे. लोकेशला दर २१ दिवसांनी जळगावला नेऊन रक्त द्यावे लागते.

असे असले तरी आज लोकेशने आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नवोदयची परीक्षा उत्तीर्ण केली, ही अतिशय विशेष बाब आहे.

त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील, बहीण हर्षा व लहान भाऊ ललित यांच्या जीवनात एक नवीन आनंद निर्माण झाला आहे. यासाठी मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ‘नवोदय’मधील या यशाबद्दल लोकेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

थॅलेसीमिया आजार म्हणजे काय?

हा एक असा आजार आहे, की जो मुलांमध्ये जन्मापासूनच असतो. जन्मल्यानंतर तीन महिन्यांनी त्याची लक्षण दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, या आजारामध्ये बाळाच्या अंगातील रक्त कमी होऊ लागते. जेणेकरून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT