Jalgaon Crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News: पिस्तूलचा धाक दाखवत पेट्रोलपंपावर लूट; जानवे शिवारात मध्यरात्री थरार

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : धुळे रस्त्यावरील डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोलपंपावर अज्ञात व्यक्तीने पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे ३६ हजार ५०० रुपये लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षकांनी भेट दिली.

डांगर शिवारात असणाऱ्या पांडुरंग पेट्रोलपंपावर शुक्रवारी (ता. २४) रात्री किशोर रवींद्र पाटील हे कार्यरत असताना सव्वाबाराच्या सुमारास चेहरा पूर्णपणे काळ्या रंगाच्या रुमालाने बांधलेला एक अनोळखी पुरुष आला. त्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्याच्याजवळ असलेल्या पिस्तूल दाखवून त्यांच्याकडे असलेले पेट्रोल-डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले.

त्याच वेळेस एक चारचाकी चालक पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला असता लुटारूने त्याच्या चारचाकी गाडीच्या डिक्कीला लाथा मारून चालकास गाडी बाहेर निघण्यास भाग पाडले. त्याला बंदुकीचा धाक दाखवीत त्याच्या कानाखाली मारली.

त्याच्याजवळ असलेले पाकिट हिसकावून तो रस्त्याकडे गेला. रस्त्यावर त्याला घेण्यास दुचाकीवर घेण्यासाठी एक तरूण आला व ते दोन्ही दुचाकीवर बसून धुळ्याकडे रवाना झाले. त्यानंतर पैशांचा हिशोब केला असता नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार २००, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार ३०० व इंडिका कारमध्ये डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून ९ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून चोरून नेले आहेत.

याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा.रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे पुढील तपास करीत आहेत.

अधिकारी घटनास्थळी
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक राकेश चोपडे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या वेळी एलसीबीचे एक व स्थानिक पोलिसांचे एक अशी २ पथके संशयितांच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT