magnificent 80 feet tall image of Lord Shri Ram is placed on Lal Bahadur Shastri Tower in center of Jalgaon city  esakal
जळगाव

Jalgaon News : प्रभू विराजे, अपने स्थान... जय श्रीराम जय श्रीराम

प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येत त्यांच्या स्थानावर विराजमान होत असताना देशभर नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा देशवासीयांना दिवाळी साजरी करण्याची संधी प्रभू रामचंद्र घेऊन आलेय.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अयोध्येत सोमवारी श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्येत त्यांच्या स्थानावर विराजमान होत असताना देशभर नोव्हेंबरमध्ये दिवाळी साजरी झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा देशवासीयांना दिवाळी साजरी करण्याची संधी प्रभू रामचंद्र घेऊन आलेय.

सुर्वणनगरी जळगावला याला अपवाद नाही. जळगाव नगरी भगवे ध्वज, रामाच्या प्रतिमा आणि रोषणाईने न्हाऊन निघालीय. (magnificent 80 feet tall image of Lord Shri Ram is placed on Lal Bahadur Shastri Tower in center of Jalgaon city news)

अयोध्येत सोमवारी (ता.२२) होत असलेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व जैन इरिगेशनतर्फे शास्त्री टॉवर, स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे करण्यात आली आहे.

यासह भाऊंचे उद्यान, महात्मा गांधी उद्यान, गौराई उद्यान याठिकाणी आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. यातून जळगावला दिवाळीची अनुभूती आहे.

टॉवरवर विराट दर्शन

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची भव्य अशी ८० फूट उंचीची प्रतिमा जळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या लालबहाद्दुर शास्त्री टॉवरवर साकारली आहे. ही प्रतिमा कान्हदेशातील सर्वात मोठी असेल.

यानंतर स्वातंत्र्य चौकात ३० फूट तर आकाशवाणी चौकात ४० फुटांचे प्रतिमा उभी करण्यात आली आहे. या प्रतिमेतून प्रभू श्रीरामाचे विराट दर्शन होत आहे.

५१ मंदिरांत फळवाटप

जैन इरिगेशनतर्फे शहरातील जवळपास ५१ मंदिरांमध्ये केळी वाटप केली जाईल. उद्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना केळी प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी शिवराज्याभिषेक लोकोत्सव समिती महाबळ उपनगर यांचे सहकार्य असेल.

रामविचारांचे दर्शन

काव्यरत्नावली चौकामध्ये सण-उत्सव व महापुरुषांच्या जयंती दिनी विशेष सजावट केली जाते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने प्रभू श्रीरामाच्या १६ फूट प्रतिमेचे आणि सोबत ५ फुटी चार दिवे हे आकर्षक असेल यासह रोषणाई असेल. ‘दर्शन.. वत्सलतेचे, मातृ-पितृ भक्तीचे! दर्शन.. त्याग, सत्यवचन, संस्कृतीचे! आदर्श संस्कार मर्यादेचे, पुरूषोत्तमांच्या सहिष्णुतेचे!’ या संकल्पनेवर आधारित सजावटीसह शुद्ध आचरणाचा संदेश दिला आहे

स्नेहाच्या शिदोरीत शिरा

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या १३ हजारहून अधिक सहकाऱ्यांना पेढे वाटप केले जातील. कांताई सभागृह येथे वाटप होणाऱ्या ‘स्नेहाच्या शिदोरी’ सोबत ड्रायफूट शिरा दिला जाईल.

अशोक जैन अयोध्येत

देशातील जवळपास १२५ परंपरांचे संत-महापुरूष व भारतातील सर्व शाखीय २५०० श्रेष्ठ पुरूषांची अयोध्येत उपस्थिती असेल. या सोहळ्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हेही निमंत्रित असून ते अयोध्येत उपस्थितीत राहून जिल्ह्यातील ५० लाख भाविकांचे प्रतिनिधित्व करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT