Jalgaon: Dignitaries with disabled students of Udan Institute in Kite Festival esakal
जळगाव

Makar Sankrant News : उडान पतंगोत्सवाने आणली रंगत दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला आनंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘उडी उडी जाय, दिल की पतंग तेरी उडी उडी जाय...’, असे म्हणत एकाहून एक आकर्षक पतंग उडवत गीत व संगीताच्या तालावर दिव्यांग बालकांनी ठेका धरला होता.

मकरसंक्रांती सणानिमित्त रुशील मल्टिपर्पज फाउंडेशनने महापौर जयश्री महाजन यांच्या सहकार्याने यंदाचा सहावा उडान मणियार मैदानावर पतंगोत्सव पार पडला. पतंगोत्सवात उडान संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थी व जळगावकरांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

महापौर जयश्री महाजन अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. शांताराम सोनावणे, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, ॲड. जमील देशपांडे, ॲड. सूचिता हाडा, प्रा. राकेश चौधरी उपस्थित होते. उडानच्या संचालिका हर्षाली चौधरी यांनी प्रास्ताविक केले. (Makar Sankranti Festival Celebrate with Disabled Students enjoyed kite flying Rushil Multipurpose Foundation initiation Jalgaon News)

मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पतंगोत्सवात उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राचे ६८ विद्यार्थ्यांनी मनसोक्त पतंग उडवत विविध गीतांवर नृत्य करून आनंद लुटला. त्यांचे पालक व नागरिकही उपस्थित होते.

याप्रसंगी सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेत उत्साह दाखविला. उपक्रमासाठी हेतल पाटील, चेतन वाणी, जयश्री पटेल, सोनाली भोई, देवकी महाजन, प्रतिभा पाटील, महेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman in Cave : परदेशी लोकांना भारत स्वर्गासारखा, 'त्या' रशियन महिलेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असे का म्हटले?

Miraj Dangal : मिरजेत दोन गटांत राडा, जातीविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य; नेमकं रात्री काय घडलं?, पोलिसांची भूमिका काय

Laxmi Niwas : अखेर तो क्षण आलाच ! जान्हवी शिकवणार जयंतला धडा; लेखिकेचंही कौतुक करत प्रेक्षक म्हणाले "ज्जे बात !"

Latest Marathi News Live Update : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा रुग्णालयात दाखल; आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Pune Weather Update : पुण्यात तापमानाचा पारा चढला, पुढील काही दिवसांत उकाडा वाढणार

SCROLL FOR NEXT