Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon municipality News : घनकचरा प्रकल्पासाठी निमखेडी, पिंप्राळा येथील जागा उपलब्ध करा; जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली निमखेडी व पिंप्राळा शिवारातील जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व राहुरी कृषी विद्यापीठास दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतर्फे महाराष्ट्र नागरी अभियान २.० राबविण्यात येत आहे. या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेली निमखेडी व पिंप्राळा शिवारातील जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व राहुरी कृषी विद्यापीठास दिले आहे. (Make land available at Nimkhedi Pimprala for solid waste project Collectors letter Jalgaon municipality News)

महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे. यासाठी पिंप्राळा शिवारातील गट नंबर १३ पैकी ८०० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यास महापालिकेने विनंती केली आहे.

ही जागा कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२) यांचे नावे जागा नमूद आहे. तरीही ही जागा महापालिकेस देण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कळविण्यात आले आहे.

तर याच अभियानासाठी निमखेडी शिवारातील गट नंबर ६७, ६८, ६९, ७०, ७२ व ७३ या पैकी एक हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याबाबत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना विनंती केली आहे.

ही जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावे असल्याने जागा महापालिकेस प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आपले नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT