crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ओंकारेश्‍वर मंदिराजवळ तरुण-तरुणीला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील ओंकारेश्‍वर मंदिराजवळील रस्त्यावर बोलत असलेल्या एका तरुण आणि तरुणीला दुचाकीवरील एकाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.

जीवे ठार मारण्याची धमकी दिली.(Man and woman beaten up near Omkareshwar temple jalgaon crime news)

‘मला सोडून दुसऱ्याशी बोलते, माझ्याशी बोलत नाही', असा संताप करत तरुणाने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मुक्ताईनगरातील एसएमआयडी महाविद्यालय परिसरात भावेश नरेंद्र सपकाळे (वय १८) हा तरुण आई-वडील कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे.

बुधवारी (ता.६) सायंकाळी सहाला भावेश हा त्याच्या मैत्रिणीसमवेत बोलत उभा होता. त्यावेळी शुभम नावाचा (पूर्ण नाव माहिती नाही) तरुण हा त्याची पल्सर गाडी (एमएच १९ जेए ४५५५) वरून आला. भावेशच्या मैत्रिणीला दुचाकीची धडक दिली.

त्यानंतर तिला काठीने मारहाण करत डाव्या डोळ्याजवळ दुखापत केली. भावेशला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मारहाणीनंतर भावेशने मैत्रिणीसमवेत पोलीस ठाण्यात जाऊन शुभमविरुद्ध तक्रार दिली. पोलिस नाईक प्रशांत पाठक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT