death  esakal
जळगाव

वडील गेल्याने 3 अपत्य पोरकी; जळगावात उष्माघाताने मृत्यू

जळगावचे तापमान दरवर्षी रेकॉर्डब्रेक असते.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगावचे तापमान दरवर्षी रेकॉर्डब्रेक असते. गेल्या दोन वर्षात उष्माघाताच्या घटनांना कोरोनानिमित्त (Corona) लावलेल्या संचारबंदीमुळे ब्रेक लागला होता. यंदा मात्र उष्माघाताने मार्च महिन्यात एक आणि त्यानंतर किशोर खलपे (वय ३७, रा. धरणगाव) यांच्या रुपात दुसरा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कामाच्या शोधात गाठलं जळगाव

मूळ धरणगाव येथील रहिवासी किशोर खलपे गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील हरिविठ्ठलनगरात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आले होते. गुरुवारी (ता. २६) दिवसभर उन्हातच काम केल्याने त्यांना त्रास जाणवत होता. अशातच सायंकाळी ते हरिविठ्ठलनगरातील रिक्षा स्टॉपजवळ चक्कर येऊन कोसळले. परिसरातील नागरिकांसह नातेवाइकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या अंदाज व्यक्त होत असून तशी नोंद रामानंदनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार उषा सोनवणे या करीत आहे.

तीन लेकरं झाली अनाथ

साधारणत: तीन वर्षांपूर्वीच किशोर खलपे यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून तीन अपत्ये वडिलांसोबतच राहत होते. कामानिमित्त ते धरणगाव सोडून जळगावात आले होते. परंतु येथे उष्माघाताने त्यांचा बळी घेतल्याने त्यांच्या पश्चात आता मुलं पोरकी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT