beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : भाच्यांना भेटायला आलेल्या मामाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील उस्मानिया पार्क येथे राहणाऱ्या भाच्यांना भेटण्यासाठी आलेल्या मामाला चौघांनी मिळून बेदम मारहाण करत लोखंडी पट्टी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (man was brutally beaten by 4 people and seriously injured jalgaon crime news )

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, तौसिफ शेख सलीम काकर (वय ३२) हा तरुण पोलिस कॉलनी, सुप्रीम कॉलनीत आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मृत झालेली चुलत बहिणीच्या मुलांना भेटण्यासाठी रविवार (ता. २३) सायंकाळी पाचला तौसिफ उस्मानिया पार्क येथे गेला होता.

याचा राग आल्याने शरीफ रहेमान काकर (रा. तांबापूर), भिकन सलीम काकर, शाहरुख ऊर्फ गुड्डू सलीम काकर आणि सलीम नजीर काकर (सर्व रा. उस्मानिया पार्क) यांनी तौसिफला बेदम मारहाण केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यातील एकाने लोखंडी पट्टी डोक्यात टाकल्याने तौसिफ गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

तौसिफने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शरीफ रहेमान काकर (रा. तांबापूर), भिकन सलीम काकर, शाहरुख ऊर्फ गुड्डू सलीम काकर आणि सलीम नजीर काकर (सर्व रा. उस्मानिया पार्क) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक शशिकांत पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

Buldhana Andura Accident: अंदुराजवळ एसटी बस-दुचाकी भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील भेगांमुळे नियंत्रण सुटल्याचा आरोप

Ambegaon Rain : आंबेगाव पूर्व भागात मान्सूनचा दमदार प्रवेश; वादळी पावसाने झाडे कोसळली, कांदा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT