Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality : महापालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षाचा तिढा सुटला; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality : महापालिकेच्या तब्बल बाराशे कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू होण्यासह स्थायी कर्मचारी सेवा, पदोन्नत्या, वय क्षमापण व शैक्षणिक अर्हता नियमीत करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा तिढा आता सुटला आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. आमदार सुरेश भोळे यांनी त्यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याचे सांगण्यात आले. (Many years of problem of municipal employees were solved jalgaon news)

तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या १९९१-९२ ते १९९७-९८ या कालावधीत झालेल्या अनियमीत भरतीसंदर्भात विशेष लेखापरीक्षण लावण्यात आलेले होते. त्यात जवळपास ११५० ते १२०० कमर्चाऱ्यावर अनियमित नेमणुका, पदोन्नत्या, शैक्षणिक अर्हता व वयाधीक्याबाबत आक्षेप घेण्यात आल्याने हे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित होते.

तसेच, जे कर्मचारी निवृत्त झाले, त्यांना मागील चार वर्षांपासून रजा वेतन व उपदानाच्या रक्कमा मिळत नव्हत्या. त्यामुळे या त्रस्त कर्मचाऱ्यांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेत, ही समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले होते. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार आमदार भोळे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा केला.

वेळोवेळी नगरविकास, सामान्य प्रशासन, मुख्य सचिव विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेऊन या कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मांडले. तसेच, पालिका प्रशासन व संचानलयात जाऊन त्यांनादेखील कर्मचाऱ्यांच्या व्यथा सांगितल्या व त्यांच्याकडून सकारात्मक अहवाल तयार करून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला.

त्यावर मंगळवारी (ता. ३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात एकवेळची बाब म्हणून सदर स्थायी कर्मचारी सेवा, पदोन्नत्या, वय क्षमापन व शैक्षणीक अर्हता नियमीत करण्यास मान्यता दिली. त्याबाबतचा आदेशही लवकरच जारी होणार असल्याचे सांगण्यात आले.

"महापालिकेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनुकंप भरती व पदोन्नतीचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे. तसेच, निवृत्त कर्मचाऱ्यांना रजा वेतन व उपदानाची रक्कमदेखील आता मिळणार आहे." -सुरेश भोळे, आमदार, जळगाव शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Abhishek Sharma ला मी तीन बॉलमध्येच आऊट केलं असतं', पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा; पाहा Video

Shambhuraj Desai : साताऱ्याच्या पालकमंत्र्यांचा थेट उध्दव ठाकरेंनाच खोचक टोला, म्हणाले....

Latest Marathi News Live Update : गेवराईच्या ढोक वडगावातील शेतक-याने गळफास घेऊन संपवले जीवन

Mumbai: मुंबई पोलिसांसाठी ‘गेम-चेंजर’ प्रकल्प! अत्याधुनिक गृहनिर्माण टाउनशिप उभारणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Ravindra Jadeja : 'वनडेत खेळायचंय, पण कर्णधार, कोच आणि...'ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यावर अन् वर्ल्ड कपबद्दल जडेजाने सोडलं मौन

SCROLL FOR NEXT