जळगाव

संत मुक्‍ताबाई पालखीचे प्रस्‍थान; नवीन मंदिरात मुक्‍काम

सकाळ डिजिटल टीम

या पालखीचे प्रस्थान आज जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत झाली.

मुक्ताईनगर (जळगाव) : तापी तिरावरील श्रीसंत मुक्ताबाई समाधीस्थळ (Sant muktabai palkhi kothali) श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर येथून भीमातीरावरील विठूरायाचे भेटीसाठी आषाढी वारीतील मानाच्या दहा पालख्‍यांपैकी प्रथम निघणारी (Pandhrpur aashidhi wari) श्री संत मुक्ताबाई पालखी. या पालखीचे प्रस्थान आज जुने मुक्ताबाई मंदिर कोथळी- मुक्ताईनगर येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत झाली. (jalgaon-aadhadhi-pandharpur-wari-sant-muktai-palkhi)

आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगरसोबत पांडुरंगाच्‍या दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची ३१२ वर्षापासूनची परंपरा आहे. मध्यप्रदेश खानदेश विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. ७०० किमीचे अंतर ३३ दिवसात ऊन पाऊस वारा याची तमा न बाळगता पिढ्यान्‌पिढ्या वारी चालू राहिली आहे. मात्र मागील वर्षांपासून या वारीला कोरोनाची दृष्ट लागली असून शासनाकडून जनतेच्या हिताकरिता निर्बंध घातल्‍याने वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षी सुध्दा कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांचे प्रमाणभूत संताचे दहा मानाच्या पालख्यांना मान्यता दिलेली आहे.

प्रस्‍थान सोहळा ऑनलाइन

जळगाव जिल्‍ह्यातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश असून या पालखीचे परंपरेनुसार जेष्ठ शु. ४ ला प्रस्थान होत असते. त्याप्रमाणेच आज (ता.१४) जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी अकराला मोजक्याच वारकऱ्यांच्‍या उपस्थितीत प्रस्‍थान झाले. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख हभप रविंद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसिलदार श्‍वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे यांची उपस्थिती होती. सोशल मिडीयाद्वारे प्रस्थान सोहळ्याचे लाईव्ह प्रसारण करण्यात आले. यामुळे भाविकांनी घरबसल्या सोहळा प्रस्थान कार्यक्रमात सहभाग घेतला.

नवीन मुक्‍ताबाई मंदीरात मुक्‍काम

पालखी प्रस्थान नंतर पालखीचा मुक्काम नविन मुक्ताबाई मंदीरात असणार आहे , शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताई मंदीर परिसरात सुरू असलेल्या कामांसाठी ग्रामविकास, पर्यटन विभागाकडे पाठपुरावा करुन निधी मिळवुन देणार असल्याचे सांगितले. कोरोनापासुन मुक्ती मिळु दे असे मुक्ताई चरणी दर्शनानंतर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT