Banana Crop insurance Banana Crop insurance
जळगाव

नऊ महिन्यांनंतरही विम्याची भरपाई मिळेना; दोन हजार केळी उत्पादकांना प्रतीक्षा

नऊ महिन्यांनंतरही विम्याची भरपाई मिळेना; दोन हजार केळी उत्पादकांना प्रतीक्षा

सकाळ डिजिटल टीम

रावेर (जळगाव) : २०१९-२० या आर्थिक वर्षातील पीकविमा (Crop insurance) काढलेल्या जिल्ह्यातील सुमारे दोन हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) नऊ महिन्यांनंतरदेखील संबंधित विमा कंपनीने वाऱ्याच्या (Banana Crop insurance) वेगाने झालेल्या नुकसानीची भरपाईची रक्कम दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जून महिन्याअखेर ही रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीचे अधिकारी तोंडी देत असले तरी, आता नऊ महिन्यांनंतर व्याजासकट ही रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (banana-crop-insurance-last-nine-month-not-refund-farmer)

ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या कंपनीने जिल्ह्यातील सुमारे ४३ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यां‍चा विमा २०१९-२० या आर्थिक वर्षात काढला होता. या काळात वेगाने वारे वाहिल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे. विमा करारानुसार ही भरपाई ३० सप्टेंबर २०२० पूर्वीच मिळणे अपेक्षित असताना, वेगवेगळी कारणे सांगत विमा कंपनी शेतकऱ्यांचे पैसे देत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या विमा कंपनीने कृषी विभागाला दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एक हजार ९२७ आणि तालुक्यातील एक हजार २०२ इतक्या विमा काढलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे. शेतकऱ्यांचा तक्रारीचा मेल कंपनीपर्यंत पोचला नाही, तसेच बँकेकडून या शेतकऱ्यांबाबतचे कन्फर्मेशन मिळाले नाही, अशी विविध कारणे पुढे करीत ही विमा कंपनी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे देण्यास विलंब करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील या एक हजार २०२ शेतकऱ्यांमध्ये खानापूर- ४२०, खिरोदा प्र यावल- ४३०, निंभोरा- २७६, खिर्डी बुद्रुक- ५७, रावेर- १७ आणि सावदा- एक अशा शेतकऱ्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एक हजार ९२७ शेतकरी

विम्याचे पैसे मिळणे प्रलंबित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे ः अमळनेर- दोन, भुसावळ- १८, बोदवड- एक, चोपडा- ९७, धरणगाव- ११, एरंडोल- दोन, जळगाव- ३९, जामनेर-सहा, मुक्ताईनगर- ३९९, रावेर- एक हजार २०२, यावल - १५०.

केवळ तोंडी आश्‍वासन

या सर्व शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रक्कम जून महिन्याअखेर सेटल करण्याचे आश्वासन कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी तोंडी देत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि ज्यांची नावे या एक हजार ९२७ शेतकऱ्यांच्या यादीत नाहीत, त्यांनाही विमा भरपाई मिळण्यासाठी त्यांनी नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडे तक्रार केलेल्या तक्रारीचे पुरावे (ई-मेल) सादर केल्यास त्यांनाही भरपाई मिळेल, असे आश्वासन कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी तोंडी देत आहेत, अशी भरपाई मिळाली नसलेल्या शेतकऱ्यांची संख्याही हजारांवर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली

कंपनी फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याची त्यांची भावना आहे. विमा हप्ता एक दिवस उशिरा भरल्यास विमा कंपनी दंड वसूल करते, आता कंपनी नऊ महिने झाले तरीही पैसे देत नाही, तर थकीत भरपाई व्याजासह द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT