Chandrashekhar Azad 
जळगाव

भुसावळ रेल्‍वेस्‍थानकावर स्‍वातंत्र्याच्या इतिहासाची सुवर्णक्षण; चंद्रशेखर आझादांच्या अशाही आठवणी जुळल्‍यात

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : येथील रेल्वेस्थानकाचा ऐतिहासिक स्थानकांमध्ये समावेश करण्यात येतो. स्वतंत्र्योत्तर काळात क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आवडती पिस्टल (मॉवझर) व बाँब बनविण्याची साधने भुसावळ रेल्वेस्थानकावर १९२९ मध्ये पकडण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा जीआरपी व ब्रिटिश पोलिसांसोबत गोळीबार झाला होता. 


चंद्रशेखर आझाद यांच्याबाबतीत घडलेली ही घटना देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वेस्थानकावर करण्यात येणाऱ्या सुशोभनांतर्गत याबाबत सजगता दाखविणारे वर्णनचित्र रेल्वेस्थानकाच्या प्रमुख दर्शनी भागावर आगामी २६ जानेवारीपर्यंत लावण्यात यावे, तसेच रेल्वेच्या अनेक घडामोडीत महत्त्वाचा भाग राहिलेले माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे नाव रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल किंवा रेल्वे संग्राहालयाला देण्यात येण्याची मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य परिक्षित बऱ्हाटे यांनी केली आहे.

वर्णनचित्र लावण्याची मागणी 
रेल्वे सल्लागार समितीच्या १६५ व्या बैठकीत चर्चा करताना त्यांनी ही मागणी प्रशासनाकडे केली. ही बैठक कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. १८) दुपारी तीनला घेण्यात आली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हेऑनलाइनद्वारे बैठकीत उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT