accident
accident 
जळगाव

मुरूमने भरलेले ट्रॅक्‍टर पलटी; दोन मजुरांचा दबून मृत्‍यू

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव (जळगाव) : ट्रॉलीमध्ये मुरूम वाहतुक करताना हिरापूर जवळ ट्रॅक्टरची ट्रॉली खराब रस्‍त्‍यामुळे पलटी झाली. ट्रॉलीमधील मुरूमवर मजूर बसलेले होते. त्‍यांना काही कळण्याच्या आतच ट्रॉली पलटी होवून मुरूमच्या ढिगाऱ्याखाली दोघेजण दबले गेले; यात दोघांचा मृत्‍यू झाला.
रस्‍त्‍याच्या कामासाठी मुरूमची वाहतुक सुरू आहे. ट्रॅक्‍टरद्वारे वाहतुक सुरू आहे. आज देखील काम सुरू असताना हिरापुर (ता. चाळीसगाव) येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगाव रस्तावर मुरूम घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यात खाली दबल्‍याने दोन मजुर ठार झाल्याची घटना घडली. याचवेळी येथुन जाणारे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी रूग्‍णवाहिका बोलावून, ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्याचे सांगितले. 

ग्रामस्‍थांनी काढले मुरूमाखालून
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. पावडीच्या सहाय्याने मुरूम कोरून दबलेल्‍यांना बाहेर काढण्याचा प्रयत्‍न केला. मात्र दोन्ही जण ट्रॉलीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण अनोळखी असून मृतांची ओळख पटविण्यात येत आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT