children due to death children due to death
जळगाव

कोरोनाने केले पोरके..आई- वडिलांच्या मृत्‍यूने आठ मुले पोरकी

कोरोनाने आई- वडिल गमावले; पालकांविना पोरकी झाली आठ मुले

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : आई-वडिलांचे छत्र मुलांना जगण्याची मोठी ऊर्मी देते. जीवनात पुढे जाण्याचा मार्ग सांगते, सोबत सुख-दुःखात साथ अन्‌ मार्गदर्शनही मिळते. मात्र, कोरोना महामारीमुळे (Corona death) अनेकांना आपले जन्मदाते गमवावे लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे (Jalgaon corona) आई-वडील गमावलेली आठ मुले आढळली आहेत. या मुलांचे संगोपन, शिक्षणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector abhijit raut) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेले जिल्हास्तरीय कृती दल पुढाकार घेणार आहे. लवकरच संबंधित बालकांच्या घरी जाऊन अडचणी जाणून घेणार आहेत. (Corona orphaned eight children due to death of mother and father)

शासनाने राज्यात कोरोना संसर्गामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय कृती दल स्थापन करण्यास सांगितले होते. अनाथ झालेल्या बालकांचा शोध या कृती दलाने सुरू केला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेली आठ मुले-मुली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी यांच्याकडे आली आहेत. त्यात चार जण जळगावचे, चोपडा व सावदा येथील दोन-दोन मुले आहेत.

लवकरच घेणार भेट

या आठ मुला-मुलींना सध्या फोनद्वारे संपर्क साधून मानसिक धीर दिला जात आहे. त्यांच्या अडचणी काय व मदत काय लागेल, याबाबत लवकरच संबंधितांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली जाईल. त्यानंतरच मदतीचे स्वरूप ठरवून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल.

दायित्व स्वीकारले जाईल

या मुला-मुलींचे संगोपन योग्य पद्धतीने होण्यासाठी, त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्या-त्या तालुक्याचे महिला व महिला विकास अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी या मुलांचे दायित्व स्वीकारतील. मुले दहा वर्षांच्या आत असतील तर त्यांना अकराशे रुपये दरमहा देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठविला जाणार आहे.

अनाथ बालकांची माहिती द्यावी

कोरोनामुळे पालक गमावलेल्यांची माहिती सामाजिक संस्था, नागरिकांना अधिक असते. त्यांनी अशा बालकांची माहिती जिल्हा महिला व बाल महिला कल्याण अधिकारी कार्यालयात, तहसीलदारांना द्यावी. ०२५७-२२२८८२८, ९४२३९५४९१२ या क्रमाकांवर संपर्क साधावा. कोरोनामुळे आई-वडिलांच्या निधनाने अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी त्या बालकांची माहिती आमच्यापर्यंत पोचवावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT