oxygen plant oxygen plant
जळगाव

तिसऱ्या लाटेची तयारी; पंधरा दिवसांत पाच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

तिसऱ्या लाटेची तयारी; पंधरा दिवसांत पाच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्यात जमा आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा अधिक जाणवला, बेडची संख्या कमी होती. ती तिसऱ्या लाटेत येऊ नये यासाठी जिल्ह्यात तब्बल १२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांटनिर्मितीचे कार्य सुरू आहे. त्यातील पाच ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट येत्या १५ दिवसांत कार्यान्वित होऊन त्यातून ऑक्सिजननिर्मिती सुरू होणार आहे. (jalgaon-corona-third-wave-alert-five-oxygen-plant-create)

जिल्ह्यात सध्या जिल्हा कोविड रुग्णालय, भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजननिर्मिती सुरू आहे. मोहाडी येथील रुग्णालयात दोन ऑक्सिजन प्लांट, जिल्हा रुग्णालयात एक, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, रावेर, भडगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव येथे ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचे काम सुरू आहे. सर्व प्लांटमध्ये ऑक्सिजन निर्मितीची वेगवेगळी क्षमता आहे. ती एकत्र केली असता नऊ हजार ५०० ते दहा हजार सिलिंडर दररोज भरतील एवढी ऑक्सिजननिर्मिती होणार आहे.

हे प्लांट अगोदर कार्यान्वित

चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील व मोहाडी येथील महिला रुग्णालयात अशा पाच ठिकाणचे प्लांट अगोदर कार्यान्वित होतील. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दहा दिवसांत प्लांट जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात येतील. त्यानंतर लगेच पाच-सहा दिवसांनंतर ऑक्सिजननिर्मिती सुरू होईल. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होईल, अशी शक्यता आहे. आरेाग्य यंत्रणेने त्यांच्याकडील पाच डॉक्टर, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील दहा, असे १५ शासकीय बालरोगतज्ज्ञांना तिसऱ्या लाटेत उपचारासाठी बोलविण्याचे नियोजन आहे. सोबतच खासगी बालरोगतज्ज्ञांचीही मदत घेऊन दोन-तीन टीम कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजननिर्मितीवर भर आहे. येत्या पंधरा दिवसांत पाच ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित होतील. यामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्यांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल.

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT