doctor doctor
जळगाव

आमच्‍यासाठी सर्व रूग्‍ण मायबाप; डॉक्‍टरांचे भावनिक आवाहन

आमच्‍यासाठी सर्व रूग्‍ण मायबाप; डॉक्‍टरांचे भावनिक आवाहन

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : ‘आमच्यासाठी सर्व रुग्ण हे मायबाप, बहीण, भाऊ आहेत. तुम्ही घरी आजार अंगावर काढायचा आणि नंतर आमच्यामागे ससेमिरा लावायचा. (Coronavirus) आमच्याकडे काही जादूची कांडी नाही. आपणास इतकी काळजी आहे रुग्णांची तर आमच्या सोबत काम करा. कृपया डॉक्टरांना (Doctor) त्यांचे काम करू द्या’, असे आर्त आवाहन शहरातील एका डॉक्टरांनी इतर डॉक्टरांच्यावतीने केले आहे. (coronavirus positive patient reletive and doctor post social media)

सध्या कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. शहरातील जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत असल्याने दवाखाने फुल्ल झाले आहेत. कोरोनासह इतर आजारांचेही रुग्ण दाखल आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांसह रुग्णालयांमधील कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांवर आपल्या परीने उपचार करीत आहेत.

म्‍हणूनच डॉक्‍टरांची पोस्‍ट

सध्या कोरोनामुळे बहुतांश दवाखान्यांमध्ये विशेषतः ‘आयसीयू’ युनिट असेल तर त्यात संसर्ग टाळण्यासाठी रुग्णाला भेटण्यासाठी कोणालाही येऊ दिले जात नाही. त्यामुळे बाहेर असलेले नातेवाईक डॉक्टरांना फोनवरून वारंवार आपल्या रुग्णाच्या तब्येतीविषयी विचारणा करतात. काही जण तर नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉक्टरांना सातत्याने फोनवरून रुग्णाच्या उपचाराबद्दल बोलत असतात. या प्रकारामुळे शहरातील एक खासगी डॉक्टरांनी त्रस्त होऊन व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे, की ‘सगळ्यांना हात जोडून विनंती, की डॉक्टर लोकांना काम करू द्या. हा कसा आहे आणि तो कसा आहे, यात आमचा वेळ वाया घालवू नका. आमच्यासाठी सगळे रुग्ण मायबाप, बहीण, भाऊ आहेत. तुम्ही घरी आजार अंगावर काढायचा आणि नंतर आमच्या मागे ससेमिरा लावायचा, आमच्याकडे काही जादूची कांडी नाही. त्यामुळे मी आजपासून फोन बंद करीत आहे.

डॉक्‍टरांनीही भावना समजून घ्‍याव्यात

गैरसोयीबद्दल क्षमस्व. आपणास इतकी काळजी आहे रुग्णांची तर आमच्या सोबत काम करा ही विनंती, कृपया आमची मनःस्थिती समजून घ्यावी’ अशा आशयाची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी देवासमान असतात, तेव्हा त्यांना आपल्या रुग्णाच्या तब्येतीविषयी विचारणे काही चुकीचे नाही. त्यामुळे डॉक्टरांनी देखील रुग्णांच्या नातेवाइकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातलगाने ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT