rohini khadse rohini khadse
जळगाव

रोहिणी खडसेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान; तापी पुलाचा श्रेयवाद

रोहिणी खडसेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान; तापी पुलाचा श्रेयवाद

सकाळ डिजिटल टीम

मुक्ताईनगर (जळगाव) : शहरातील जुने गावातील नागेश्वर मंदिराकडून जुने कोथळी येथील श्रीक्षेत्र मुक्ताबाई मंदिरात जाताना रस्त्यात असलेल्या पुलाचे श्रेय आमदार चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी घेऊ नये. हा पूल माजी मंत्री एकनाथराव खडसे (eknath khadse) यांनी मंजूर करून त्यावर निधी आणला असल्याने आमदारांनी श्रेयवादाचा केविलवाणा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर (rohini khadse) यांनी पत्रकार परिषदेत केले. (muktainagar tapi river briage rohini khadse chandrakant patil)

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील चंद्रशेखर बडे, माजी सभापती राजेंद्र माळी, पांडुरंग नाफडे आदींची यावेळी उपस्थिती होती. नागेश्वर मंदिराकडून जुन्या मुक्ताबाईकडे जाताना रस्त्यात ढासळलेला पूल असून, त्या पुलाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ४) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी मुक्ताईनगर संवेदना फाउंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यापुर्वीच दीडशे लाख रूपये मंजूर

चांगदेव मंदिर मानेगाव, जुनी कोथळी गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्य महामार्ग सहा रस्ता प्रजिमा ९१ मध्ये निंबा देवी मंदिराजवळ मोठ्या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमदार असतानाच तत्कालिन महसूल, कृषी, मदत, पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात मागणी केली होती. या पुलासाठी १५० लाख रुपये मंजूर देखील करण्यात आले आहे. मात्र, पुलासाठी निधी आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.

..तर जाहीर सत्कार करू

आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः केलेल्या कामाचेच श्रेय घ्यावे. इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार त्यांनी करू नये, असा आरोप करत श्रेयच घ्यायचे असेल तर आमदारांनी मेळसांगवे- पंचाने- सुलवाडी- ऐनपूर - रावेर हा तापी नदीवरील पूल करून दाखवावा, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. जर हा पूल केला तर त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT