canal
canal canal
जळगाव

बंदिस्त कालव्याचा अधिकाऱ्यांनी दिला दिशाभूल करणारा अहवाल

सकाळ डिजिटल टीम


भडगाव : मागील शासनाच्या काळात वरखेडे प्रकल्पाचा (Varkhede project) प्रस्तावित बंदिस्त कालवा (Closed canal) तांत्रिकदृष्ट्या योग्य होता आणि या शासनाच्या काळात हा कालवा तांत्रिकदृष्ट्या योग्य कसा नाही, असा प्रश्न खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी उपस्थित केला आहे. याबाबत आपण शेतकऱ्यांना एकत्रित करून आवाज उठवू. याबाबत जलसंपदामंत्र्यांना (Minister of Water Resources) पत्र पाठविल्याचे त्यांनी सांगितले. ( jalgaon mp unmesh patil given information misleading report given officials closed canal )

गिरणा नदीवरील वरखेडे प्रकल्पाचा कालवा बंदिस्तऐवजी पारंपरिक करण्याचा काही अधिकाऱ्यांचा रेटा आहे. हा अजेंडा समोर आणल्यानंतर गिरणा पट्ट्यातील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांकडून कोणत्या आधारावर बंदिस्त कालव्याला विरोध केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक कालवा होऊ देणार नाही, असा इशारा दिला.


दरम्यान, वरखेडे प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधीसाठी पाठपुरावा करणारे खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की मागील भाजप सरकारच्या काळात बंदिस्त कालवा तांत्रिकदृष्ट्या योग्य होता. मग आताच हा कालवा तांत्रिकदृष्ट्या का योग्य नाही? बंदिस्त कालव्याने दीड हजार हेक्टराहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पैशांची बचत होणार आहे. शिवाय जमीन अधिग्रहणासारखी किचकट प्रक्रिया टळणार आहे. मग असे असताना अधिकारी शासनाकडे चुकीचा अहवाल कसा देत आहेत, याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना आपण पत्र दिले आहे. वरखेडे प्रकल्पाला बंदिस्त कालवाच मंजूर करण्याबाबत त्यांच्याकडे मागणी केली आहे.


शेतकऱ्यांना एकत्रित करणार
वरखेडे प्रकल्पाचा कालवा बंदिस्तच करण्यासाठी आपण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना एकत्रित करू. याबाबत आवाज उठवू. कोणत्याही परिस्थितीत पारंपरिक कालवा होऊ देणार नाही. वरखेडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून १०० टक्के निधी आणला. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असेल, तर वेळप्रसंगी मोठे आंदोलनही उभारू, असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT