dam dam
जळगाव

जळगाव जिल्ह्यात सात टक्के पाणीसाठा कमी; मुसळधार पावसाची प्रतीक्षा

यंदाच्या पावसात या प्रकल्पामध्ये नाममात्र वाढ झाली आहे. गतवर्षाचा धरणात पाणीसाठा ‘जैसे थे’ आहे.

सुधाकर पाटील



भडगाव : जळगाव जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस (Rain) न झाल्याने गेल्यावर्षाच्या तुलनेने धरणात (Dam) पाणीसाठा (For water) तब्बल सात टक्के कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तीन मोठे व १३ मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्यावर्षी १२ जुलैपर्यंत ४०.६७ टक्के पाणीसाठा होता. तर सद्यःस्थितीला या प्रकल्पामध्ये ३३.११ टक्के उपयुक्त साठा आहे. जूनमध्ये पाऊस बरसला. मात्र, जुलैत पावसाने दडी मारल्याने गेल्यावर्षांच्या तुलनेने पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. (jalgaon district has less than seven percent water reserves)


जिल्ह्यात तीन मोठे, तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. यांची एकूण क्षमता ही १४२७ दलघमी म्हणजेच ५० टीएमसी इतकी आहे. सद्यःस्थितीला या प्रकल्पांमध्ये एकूण ४७२.६० दलघमी अर्थात १६.६९ टीएमसी इतका उपयुक्त जलसाठा आहे.

प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा
जिल्ह्यात जूनमध्ये पाऊस बरसला. मात्र, जुलैत पावसाचा वेग मंदावल्याने प्रकल्पातील साठ्यात फारशी वाढ झाली नाही. जिल्ह्यातील पाच मध्यम लघु प्रकल्प पन्नाशीच्या वर आहेत, तर निम्म्या जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ३४.११ टक्के, तर वाघूरमध्ये ६२.५ टक्के साठा आहे. यंदाच्या पावसात या प्रकल्पामध्ये नाममात्र वाढ झाली आहे. गतवर्षाचा धरणात पाणीसाठा ‘जैसे थे’ आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पाच्या बाबतीत आबादानी होती. गिरणासह वाघूर अन्य प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिल्हातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले होते. दरम्यान, तापीला पूर आल्याने हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.


दमदार पावसाकडे लागले डोळे
जिल्ह्यात जुलै महिन्यात १० तारखेपर्यंत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. त्यात काही भागात दुबार पेरणीही करावी लागली. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे गेल्या वर्षासारखाच जिल्ह्यात दमदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे प्रकल्प ही पूर्ण क्षमतेने भरून रब्बी हंगाम बहरण्यास मदत होईल.


जिल्ह्यातील प्रकल्पातील गतवर्षाचा व सद्य:स्थितील पाणीसाठा

प्रकल्प.....एकूण क्षमता.....सद्यःस्थितीचा...गतवर्षाचा
दलघमीत टक्केवारीत

हतनूर.........२५५......२१.१६.........१७.६५
गिरणा........५२३.५५......३४.११..... .३८.५
वाघूर........२४८.५५.. .६२.५.......... .७२.३४
अभोरा.......६.२.......६८.१९...........७०.१२
मंगरूळ......६.४१......६०.६५..............१००
सुकी........३९.८५.....७३.३९............७५.२७
मोर.........७.९३.....५३.८१.............६३.२५
अग्नावती....२.७६........००.................००
हिवरा......९.६०.........००.............१९.८५
बहुळा......१६.३३......१९.१९...........३१.७५
तोंडापूर......४.६४......४२.३७...........५८.७०
अंजनी........१५.६२....१७.९८..........३१.२४
गूळ..........२२.७६.....२६.२८..........६०.११
भोकरबारी......६.५४........१४.८५........६.८०
बोरी.........२५.१५.......००...........७३.४
मन्याड......४०.२७.......१८.११............२०.१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT