Deepnagar Power Generation Project Deepnagar Power Generation Project
जळगाव

दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाची राख जांभूळ नदी करतेय प्रदूषीत

वेल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडे यांच्यामार्फत वेळोवेळी दीपनगर केंद्र प्रशासनासमोर आंदोलनांमधून ही बाब निदर्शनात आणून दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम


भुसावळ : दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाची (Deepnagar Power Generation Project) राख (Ash) वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने वेल्हाळा परिरसरातील जांभूळ नदीत (Jambhul River) पाण्याबरोबर हजारो क्युबिक मीटर राख नदीपात्रात जमा झाली आहे. केंद्र वीजनिर्मितीबाबत नवीन उच्चांक साधत असताना प्रदूषणाकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी केला. दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारी राख वेल्हाळे येथील जंगलातील बंडात सोडण्यात येते. १९८५ पासून निरंतर राखेचे उत्सर्जन वेल्हाळे शिवारातील या बंडात करण्यात येत आहे. यात बंड क्रमांक १, २ व ३ अशी निर्मिती करण्यात आली असून, त्यापैकी ३० वर्षांमध्ये बंड क्रमांक एक व दोन हे पूर्णपणे राखेने भरून बंद करण्यात आले आहेत, तर बंड ३ मध्ये राख सोडली जात असल्यापासून होणाऱ्या प्रदूषणाकडे मात्र वीजनिर्मिती केंद्राने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

(bhusawal deepnagar power generation project jambhul river polluted)

उपाययोजना शून्य
शासनाच्या प्रदूषणाबाबत नियम व अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन किंवा त्यासाठी त्यांच्या पर्यावरण विभाग व स्थापत्य विभागामार्फत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे वेल्हाळे परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा त्रास होत असून, जनता आरोग्यविषयक समस्येने त्रस्त आहे. २००९ पासून वेल्हाळे परिसरात राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या बाबतीत मच्छिमार सोसायटी, वेल्हाळे ग्रामपंचायत, संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समिती वेल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडे यांच्यामार्फत वेळोवेळी दीपनगर केंद्र प्रशासनासमोर आंदोलनांमधून ही बाब निदर्शनात आणून दिली आहे. मात्र, आजपर्यंत लेखी आश्वासनांपलीकडे काहीही करण्यात आलेले नाही.


नैसर्गिक संपदेचा नाश
नदी, तलावात आलेल्या राखेसंदर्भात मुख्य अभियंता यांना भेटले असता फंड नाही, प्रकल्पातीलच कामे बंद आहे, नंतर बघू, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रकल्पामध्ये गरज नसलेली कामे मात्र वरिष्ठ कार्यालयाकडे कामाचे नियोजन करून निधी मागवून केली जात आहेत. त्या कामांना प्राधान्य दिले जाते. मात्र, राखेपासून होणाऱ्या प्रदूषणाकडे डोळेझाक केली जात आहे. या प्रदूषणात आतापर्यंत भोगावती नदीमार्गे तापी नदीत होणारे प्रदूषण, राख वाहून नेणारी जलवाहिनी फुटून किंवा चोकअपमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नैसर्गिक संपदेचा नाश होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, एक जण जखमी

MahaDBT Portal Down: महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्यांपासून ठप्प, सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्थाचालकांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT