police 
जळगाव

भुसावळला पोलिस ॲक्शन मोडमध्ये; कुंटणखान्यावर छापा

Police News : कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : जंक्शन शहरात पोलिस (Police) प्रशासन गुन्हेगारीचा (Criminal) बीमोड करण्यासाठी ॲक्शन मूडमध्ये आले आहे. शहरातील जामनेर रोडलगत असलेल्या कुंटणखान्यावर छापा मारत दोन आंबटशौकिनांना ताब्यात घेतले, तर एका महिलेची सुटका केली. यासह दारूअड्ड्यावर धाड टाकत एकास ताब्यात घेतले. सण-उत्सवाच्या (Utsave) काळात बाजारपेठ हद्दीत घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितासदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले.


सण-उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा, सण-उत्सव नियमाच्या चौकटीत साजरे व्हावेत व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सातत्याने शहरासह ग्रामीण भागात पोलिस गस्त घालत आहेत. याचदरम्यान जामनेर रोडवरील कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली. यादरम्यान कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस तसेच आंबटशौकीन ग्राहक जगदीश प्रल्हाद चव्हाण (रा. पाल, ता. रावेर) यांना ताब्यात घेण्यात आले.


अवैध दारूविक्रीवर छापा
शहरातील अशोकनगर भागात कैलास होलाराम सहदेव (वय ४५) अवैध दारू विक्री करत असताना त्याच्याकडून ९०० रुपये किमतीच्या १५ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली. पोलिस नाईक विकास सातदिवे तपास करीत आहेत.


घरफोडीचा संशयित अटकेत
शहरातील हॉटेल प्रीमियर परिसरात रात्री संशयितरीत्या घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणारा नाशिक येथील संशयित आरोपी रईस अब्दुल रहमान (२६) याला बुधवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश चौधरी तपास करीत आहेत. या तिन्ही कारवाया उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश धुमाळ, मंगेश गोंटला, पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन, सागर आवटे, सचिन गिरी, पोलिस कर्मचारी रवींद्र बिराडे, नितीन सपकाळे, विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, संदीप परदेशी, नीलेश चौधरी, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, परेश बिराडे, जीवन कापडे, योगेश माळी, अक्षय चव्हाण, जावेद शहा, सीमा चौधरी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT