जळगाव

भीक मागता मागता एक दिवशी वृध्दा पडली नाल्यात; याच कारणातून मिळाली आजीला नवी दृष्टी 

अमोल अमोदकर

बोदवड  : लॉकडाउनच्या काळात सर्वच घटकांची होरपळ झाली. भिक मागणाऱ्यांना तर रस्ताही दुरापास्त झाला. जिथे दोन वेळेचे पोट भरण्याची भ्रांत, तिथे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न तर दूरच...अशाच एक साधारण ६२ वर्षांच्या आजीबाई घरोघरी मागून आपला उदरनिर्वाह करीत होत्या. इंदूबाई पवार त्यांचं नाव...आजींना दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असल्याने काहीच दिसत नव्हते...एक दिवशी त्या चालता चालता अक्षरशः नाल्यात पडल्या...ही बाब जेव्हा आत्मन्मान फाउंडेशनचे प्रतिनिधी समाधान पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच त्यांची तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. आत्मसन्मानच्या या प्रयत्नामुळे आजीबाईंना नवी दृष्टी मिळाली आहे. 


प्राथमिक तपासणीसाठी बोदवडमधील दृष्टी नेत्र तपासणी सेंटर येथे आजींची तपासणी केली. येथून शस्रक्रियेसाठी नांदुरा येथील १०५ फूट हनुमानजी मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थानकडून संचालित मोहनराव नारायणा नेत्रालय येथे आजींची मोफत मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आली. 
यात डॉक्टरांनी व येथील कर्मचारी बंधू भगिनींनी अतिशय काळजीपूर्वक सुश्रृशा केली. आजींसाठी जेवणाची, राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परिणामी, शस्रक्रिया झाल्यानंतर आजींना दिसू लागले आहे. आज त्या स्वतः कुणाचाही आधार न घेता चालू शकतात.

नवीन दृष्टी मिळाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्याजोगा होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहनराव नारायणा नेत्रालयाचे अध्यक्ष म्हणाले, की इंदूबाई पवार (रा. बोदवड) यांना जेव्हा नांदुरा येथे नेत्रालयात आणले होते, तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हते, ते पाहून मन व्यथित झाले, पण शस्रक्रिया झाल्यानंतर आजीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनात भाव जागला की संस्थेकडून नेत्रालय चालविण्याचा हाच उद्देश आहे, की नेमक्या गरजूपर्यंत ही सुविधा पोहचावी आणि ही वाटचाल योग्य दिशेला आहे. आजींना पुन्हा दृष्टी मिळून देण्यासाठी मोहनराव नारायणा नेत्रालयाची टीम व आत्मसन्मानचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Blockade: अमेरिकेची नाकेबंदी निष्फळ? समुद्री मार्ग बंद, तरी इराणचा नवा डाव; रेल्वेने चीन आणि पाकिस्तानला तेल पुरवठा

३० फेब्रुवारीला जन्म, कागदपत्र पाहून मुस्लीम महिलेची याचिका फेटाळली; भारतीय मानण्यास हायकोर्टानं दिला नकार

सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपांवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची गर्दी

Religious Tourism Bus Service : शिवशाही, आरामदायीमधून पर्यटकांसाठी विशेष बस सेवा, सहलींमध्ये निवास व भोजन व्यवस्था

Gadchiroli: दिल्ली येथे शैक्षणिक सहलीसाठी नागपूर विमानतळावरून प्रस्थान करताना विद्यार्थी.गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे विमानाने 'दिल्ली उड्डाण'; संसद भवन आणि राष्ट्रपती भवनाला देणार भेट !

SCROLL FOR NEXT