Ossuary kalash Ossuary kalash
जळगाव

चाळीसगावात खोदकामावेळी सापडला डॉ. आंबेडकरांचा अस्थिकलश

Dr. Babasaheb Ambedkar News : १९५८ मध्ये जेव्हा हा पुतळा उभारण्यात आला, तेव्हा त्यांनी हा अस्थिकलश पुतळ्याखाली ठेवला होता.

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव ः शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पुतळ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना गुरुवारी (ता. २२) खोदकामावेळी पुतळ्याखाली सुमारे दहा फूट खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) अस्थिकलश (Ossuary kalash) मिळून आला. या अस्थिकलशाचे पावित्र्य जपत तो पुन्हा नवीन पुतळ्याच्या (Statue) ठिकाणी होता तसा ठेवण्यात येणार आहे.

(chalisgaon under the statue during excavation dr. babasaheb ambedkar ossuary kalash found)


समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘नगरसेविका सायली जाधव व रोशन जाधव यांच्या पुढाकाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पालिकेच्या माध्यमातून सध्या नूतनीकरण सुरू आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा असलेल्या ठिकाणी खोदकामादरम्यान हा अस्थिकलश मिळून आला. ज्याविषयी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक (स्व.) भगवान शंकर बागूल यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तावेजानुसार तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा मुंबईत ९ डिसेंबरला चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. १० डिसेंबरला त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या हजारो लोकांनी मुंडण केले. ज्यात चाळीसगावचे कट्टर आंबेडकरी नेते श्‍यामाजी जाधव, दिवाण चव्हाण यांच्यासह डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांचा समावेश होता. या सर्वांनी भय्यासाहेबांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी चाळीसगावला आणल्या. १९५८ मध्ये जेव्हा हा पुतळा उभारण्यात आला, तेव्हा त्यांनी हा अस्थिकलश पुतळ्याखाली ठेवला होता. तो गुरुवारी खोदकाम करताना मिळून आला. तो पुन्हा पूर्वी होता तसा नवीन पुतळ्याखाली ठेवून आमच्या पूर्वजांचा हा वारसा जपणार असल्याचे श्री. बागूल यांनी सांगितले.


नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अस्थिकलशाची माहिती समजताच तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन याविषयीची माहिती जाणून घेतली. अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक भवन सोडले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT