जळगाव

पोलिस, कृषी विभागाची धडक कारवाई..बोगस बियाणे जप्त

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : वाळकी (ता. चोपडा) येथे शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घरावर छापा टाकून प्रतिबंधित ६० हजारांची ‘मा लक्ष्मी’ एचटीबीटी कापूस बियाण्यांची ५० पाकिटे जप्त करण्यात आली. कृषी विभाग (Department of Agriculture) व चोपडा ग्रामीण पोलिसांनी (Chopra Rural Police) संयुक्तरीत्या ही कारवाई (acction) केल्याने बोगस बियाणे (Bogus seeds) विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

(agriculture department police acction bogus seeds)

तालुक्यात दर वर्षीच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन ही नगदी पिके अस्मानी संकटामुळे नेस्तनाबूत होतात. त्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बोगस बियाणे विकले जाते. कृषी विभागाला शुक्रवारी (ता. २१) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाळकी (ता. चोपडा) येथील पांडुरंग श्यामराव ढिवर (वय ४५, रा. वाळकी, ता. चोपडा) स्वतःच्या फायद्यासाठी शासनाकडून बंदी असलेले मान्यताप्राप्त नसलेले संशयित एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या पद्धतीने विनापरवाना शेतकऱ्यांना विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, पंचायत समिती कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शिंपी यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वाळकी (ता. चोपडा) येथे संबंधित संशयिताच्या घराची तपासणी व झाडाझडती करीत असताना संशयिताची पत्नी आणि मुलांनी घराची झडती घेण्यास विरोध केला.

या वेळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप आराक यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून तत्काळ बंदोबस्त मागविला. पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस नाईक रितेश चौधरी, होमगार्ड रोशन बाविस्कर, प्रदीप शिरसाठ, रत्ना बडगुजर शासकीय वाहनासह तेथे आल्यावर पोलिसांसमक्ष घराची झाडाझडती घेतली असता घराच्या मागील बाजूस शौचालयात शासनमान्यता नसलेली कापूस बियाण्यांची ५० पाकिटे असलेली एचडीपीई पांढरी गोणी (किंमत अंदाजे ६० हजार) सापडली. त्यात मिळून आलेल्या संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटावरील उल्लेख पाहता या पाकीट बियाण्याला महाराष्ट्र राज्यात परवानगी नसल्याने हे तणनाशक बीटी बियाणे बाळगणे, विक्री करणे हा गुन्हा असल्याने याचा सखोल तपास होण्यासाठी त्या पाकिटामधून संशयित एचटीबीटी तपासणीसाठी दोन पाकिटे नमुना म्हणून घेण्यात आले.

पोलिसांत गुन्हा दाखल

बीजपरीक्षण प्रयोगशाळा, नागपूर येथे नमुना तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, उरलेली ४८ पाकिटे जप्त करण्यात आली. राज्यात बंदी असलेली एचटीबीटी कापूस बियाणे अनधिकृतपणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक व विक्री करणे, कापूस बियाणे पाकिटावर बियाणे उत्पादक व त्याचे गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादकाचा उल्लेख नसणे, विनापरवाना बियाणे साठवणूक व विक्री केल्यामुळे जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक अरुण तायडे यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग ढिवर यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT