injection injection
जळगाव

टॉसिलीझुमाब इंजेक्शनचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली

जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील

सकाळ वृत्तसेवा



जळगाव ः आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशान्वये टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित शासकीय/खाजगी रुग्णालयास वाटप करण्याबाबतचे निर्देश मे. सिप्ला लि या कंपलीन निर्गमित करण्यात आलेले आहेत.
आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांचे जळगाव जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना पालन करणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते टॉसिलीझुमाब या इंजेक्शनचा साठा प्राप्त झाल्यास त्यांनी त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव व औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास द्यावी.
जिल्ह्यातील सर्व मेडीकल डिलर्स, सर्व घाऊक मेडीकल विक्रेते यांना जिल्हाधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय टॉसिलीझुमाब या इंजेक्शनचे वितरण किरकोळ मेडीकल विक्रेते यांना करता येणार नाही.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सांगितले.

संपादन - भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT